‘या’ औषधाने स्वस्तात वाचवता येणार कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर ते जून यादरम्यान कोरोनाव्हायरस जगातील कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आतापर्यंत 82 लाखाहून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे. तसेच यामुळे जवळपास साडेचार लाख रुग्ण मरण पावले आहेत आणि बरेच लोक हे जीवन मरणाच्या दारावर उभे आहेत. डेक्सॅमेथेसोन हे औषध अशा रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. असे मानले जाते आहे की सुरुवातीपासूनच झालेल्या मृत्यूची नोंद घेतली तर असे आढळून आले कि इतर औषधांऐवजी या औषधामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते. एकट्या ब्रिटनमध्येच 5 हजाराहून अधिक लोकांचे जीव वाचू शकले आहेत. यूके येथील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. हे औषध नक्की काय आहे आणि कोरोनामध्ये हे कसे काम करते ते जाणून घेउयात.

डेक्सामेथासोन म्हणजे काय ?
हे सर्वात कमी किंमतीचे स्टेरॉइड आहे जे भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. हे औषध आधीच संधिवात, रक्त रोग आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरले जात आहे. तसेच, हे औषध अ‍ॅलर्जी आणि त्वचेच्या अनेक रोगांमध्ये देखील दिले जाते. आतापर्यंत हे औषध भारतात कोरोनाच्या उपचारांसाठी दिले जात नाही आहे.

मोठ्या संख्येने रूग्णांवर हे औषध ट्रायल केले गेले आहे का ?
गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना रूग्णांची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातील डॉक्टर हे औषध देत आहेत. बर्‍याच ठिकाणी स्वतंत्रपणे त्याच्या ट्रायलही सुरु आहेत. या ट्रायलसाठी 2104 रूग्णांना घेण्यात आले आणि त्यांना सतत 10 दिवसांसाठी 6 मिलीग्राम एवढे हे औषध दिले गेले. यासह, त्यांची तुलना अशा 4321 रुग्णांशी केली गेली, ज्यांना हे औषध दिले जात नव्हते. ऑक्सफोर्ड विद्यापीठात हा प्रयोग झाला.

प्रयोगाचे परिणाम काय होते ?
यामध्ये असे आढळून आले आहे की, ज्या रुग्णांना कोरोनाच्या गंभीरतेमुळे व्हेंटिलेटर द्यावे लागले, डेक्सामेथासोनच्या तुलनेत त्यांच्या मृत्यूचा धोका हा एक तृतीयांश कमी केला जाऊ शकतो,तसेच ज्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो त्यांच्या मृत्यूचा धोका हा पाचव्या टप्प्याच्या फरकाने कमी होईल. मात्र, ही एक बाब देखील आहे की ज्यांची परिस्थिती गंभीर नाही किंवा ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशा रूग्णांवर या औषधाचा कोणताही परिणाम दिसला नाही.

ट्रायलशी संबंधित वैज्ञानिकांनी निकालांबाबत काय म्हटले ?
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ पीटर हॉर्बी या संशोधनाचे नेतृत्व करीत होते. याचे निकाल पाहताच,त्यांनी कबूल केले की, हे असे पहिले औषध आहे, जे देताना, रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीयरित्या घट झाली आहे. हे विशेषतः ज्यांच्या मृत्यूची शंका खूप जास्त आहे अशा गंभीर रूग्णांमध्ये हे जीवनरक्षक असल्याचे सिद्ध होत आहे, आताच्या क्षणी हे एक मोठे यश मानले जात आहे.

त्याचप्रमाणे संशोधनात गुंतलेल्या प्रोफेसर मार्टिन लँड्रे यांच्या मते, हे औषध दिल्यास व्हेंटिलेटरच्या सहाय्याने दर 8 पैकी 1 व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. तसेच, ज्यांना ऑक्सिजन द्यावयाचा आहे, अशा दर 20 ते 25 रुग्णांपैकी 1 पेशंट हा वाचू शकतो. म्हणजेच मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोनासाठी हे पहिले यशस्वी ठरलेले औषध आहे.

कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणावर होण्याऱ्या खर्चापेक्षा हे उपचार अधिक स्वस्त आणि सगळीकडे उपलब्ध असणारे आहे. यामध्ये एका दिवसाचा खर्च हा 478 रुपये येतो. त्यानुसार, 10 दिवसाच्या डोसची किंमत सुमारे 3,350 रुपये आहे. यामध्ये इतर खर्चाचा समावेश नाही आहे. डेक्सामेथासोन व्यतिरिक्त इतरही बर्‍याच औषधांवर ट्रायल सुरू आहेत. अशाच प्रकारे, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे एक औषध आहे, जे सुरुवातीला खूप प्रभावी असल्याचे मानले जात होते परंतु नंतर त्याच्या ट्रायलमध्ये चांगले निकाल मिळालेले नाहीत.

एप्रिलमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोव्हीड -१९ च्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध वापरण्याची औपचारिक परवानगी दिली होती. तसेच भारतही इतर देशांना मोठ्या प्रमाणात हे औषध पुरवीत होता. मात्र, त्याचे तीव्र दुष्परिणाम रूग्णांवर दिसून आले. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमध्ये काही असे गुणधर्म आहेत ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात. या अवस्थेमुळे रुग्णाला tachycardia अटॅक येऊ शकतो म्हणजेच हृदयगती वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका. MedRxiv या संशोधन वेबसाइटवरही असाच एक अभ्यास केला गेला आहे, त्याअंतर्गत 81 रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या परिणामाची तपासणी केली गेली. त्याचा परिणाम म्हणतो की त्याच्या दीर्घ डोसमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. न्यूयॉर्कने अलीकडेच 84 रुग्णांवर या औषधाचा वापर केल्याचेही पाहिले आहे. यापैकी 4 रुग्णांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर उपचारापूर्वी त्यांना ह्रदयाचा कोणताही त्रास झाला नाही.

त्याचप्रमाणे रेमेडडिव्हिअर हे औषधही कोरोनाच्या रूग्णांना रुग्ण दिले जात आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रूग्णांवर हे एक प्रभावी औषध आहे, परंतु तीव्र आजाराच्या रुग्णांवर याचा जास्त फायदा दिसला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment