हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
या शहीद झालेल्या जवानांमध्ये तेलंगणाच्या कर्नल संतोष बाबू यांचा देखील समावेश आहे. संतोष बाबू हे १६ व्या बिहार रेजिमेंटचे कमांडर ऑफिसर होते. गेल्या दीड वर्षापासून ते भारत-चीन सीमारेषेवर तैनात होते.कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अन्य दोन जवानांपैकी एकजण तामिळनाडू चे होते तर दुसऱ्या जवानाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
Colonel Santosh Babu, Commanding Officer of the 16 Bihar regiment lost his life in the violent face-off with Chinese soldiers in Galwan valley area near Patrolling Point 14: Indian Army Sources
— ANI (@ANI) June 16, 2020
तामिळनाडूतील जवानाचे नाव पलनी (वय ४०) असे होते. पलनी हे तामिळनाडूचे सुपूत्र होते. त्यांच्या भावाने या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. मात्र, अजूनही तिसऱ्या जवानाची ओळख समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे भारत-चीन सीमारेषेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. काहीवेळापूर्वीच चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने भारतीय सैन्याने पुन्हा चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा कांगावा केला. People’s Liberation Army (PLA)च्या हवाल्याने ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिले आहे.सोमवारी रात्री झालेल्या झटापटीत चीनचेही पाच सैनिक मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तर ११ सैनिक जखमी झाले आहेत. मात्र, चीनकडून यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.