ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे मिलिंद इंगळे होय. मिलिंद इंगळे यांना मी महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण आजाराच्या काळात काय अवस्था होती यासंदर्भात नुकताच एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्वांशी संवाद साधत सांगितले आहे. ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर माझी झाली होती असे सांगताना  कोरोनावर आपण यशस्वी रित्या मात केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मिलिंद इंगळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत करोनाविरुद्धच्या लढाईचा प्रवास कसा होता हे सांगितलं. “ सुरुवातीला ताप आला होता. तो बरा झाला मात्र पुन्हा तीच लक्षणे दिसू लागल्याने कोरोना चाचणी केली आणि ती सकारात्मक आली. आपल्याला कोरोना झाला आहे हे समजताच पालिकेच्या संमतीने स्वतःला घरीच विलगीकरणात ठेवले. पत्नीने अगदी व्यवस्थित सर्व गोष्टी केल्यामुळे विलगीकरणाचा फारसा त्रास झाला नाही असे त्या व्हिडिओत म्हणाले आहेत. पण काही दिवसांनी श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून नानावटी रुग्णालयात ऍडमिट झालो आणि योग्य उपचारानंतर घरी आल्यावर पुन्हा १४ दिवस विलगीकरणात राहिलो असे त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहे.

या १४ दिवसाच्या विलगीकरणानंतर मी बरा झाला असल्याचे मला वाटू लागले परंतु परिस्थिती वेगळीच होती. काही दिवसांनंतर मला परत अस्वस्थ वाटू लागलं.या त्रासानंतर मला पुन्हा रुग्णालयात जावं लागलं. त्यावेळी करोनाचा संसर्ग माझ्या शरीरातील अन्य भागांवर झाल्याचं लक्षात आलं. यावेळी मनात भीती होती. मात्र या सगळ्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे या आत्मविश्वासामुळे मी साऱ्याला सामोरं गेलो आणि या संकटावर मात केली,” असे ते या व्हिडिओत म्हणाले. अशा काळात नकारात्मक न होता, धैर्याने प्रसंगाला सामोरे जाणे खूप गरजेचे असते. असेही यावेळी ते सर्वाना उद्देशून म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here