धक्कादायक! मास्क, हेल्मेट घालून डॉक्टर दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीचा घरात घुसून हल्ला

Shocking! An unknown person wearing a mask and a helmet attacked the doctor couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील मैसुरु येथे डॉक्टर दांपत्याच्या घरांमध्ये एक अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसला. तब्बल 45 मिनिटे घरातील दोघांवर हल्ला आणि छळवणूक केल्यानंतर घरातून बाहेर निघून गेला. जाताना हात – पाय आणि चेहरा धुवून आरामात बाहेर पडला. यामुळे परिसरात दहशत पसरली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मैसूर येथील रेडिओलोजिस्ट डॉ. केशवा पी राईचुरकर आणि त्यांची पत्नी डॉ. कृष्णकुमारी असे पीडितांचे नावे आहेत. बाहेरील लोखंडी गेट वाजले त्यामुळे पती डॉ केशव क्लिनिकमधून आले असतील असे वाटल्याने डॉ. कृष्णकुमारी यांनी घराचा दरवाजा उघडला. अचानक आरोपी समोर आला. त्यांचा गळा पकडुन भिंतीवरती त्याचा चेहरा दाबला. यानंतर आतमध्ये किचन मध्ये त्यांना डांबून टाकले. थोड्याच वेळाने डॉ. केशवा सुद्धा घरी आल्यानंतर त्यांनाही जागोजागी आरोपीने चाकू मारला. गळ्यालाही कापले. त्यानंतर आरामात स्वतचे हात – पाय धुवून निघून गेला.

आरोपी हातमोजे, मास्क आणि हेल्मेट घालून आल्यामुळें त्याचा चेहरा दिसू शकला नाही. पण तो 30 वयाचा असावा असा अंदाज दांपत्याने व्यक्त केला. अश्या अज्ञात व्यक्तीच्या घरात घुसून आल्यामुळे दाम्पत्य खूपच दहशतीखाली गेले असून परिसरातच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून शोध सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like