हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना संकटात या साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे लाखो लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. म्हणूनच एसबीआयनंतर देशातील सर्व मोठ्या बँका आपल्या ग्राहकांना याबाबत सतर्क करत आहेत. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आता बँक ऑफ बडोदानेही आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. बँक ऑफ बडोदाने अनेक शहरांतील आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर पोस्ट आणि वैयक्तिक संदेशांद्वारे फेक ई-मेल्सना टाळावे असा सल्ला दिला आहे. यापूर्वी भारत सरकारनेहि एक अॅडवायजरी जारी केली आणि सर्वसामान्यांना तसेच संस्थांना मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविली.
अशा प्रकारे खात्यांमधून पैसे चोरी होत आहेत
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना ट्वीट आणि मेसेजसद्वारे सांगितले की, ‘आम्हाला माहिती मिळाली आहे की देशातील अनेक शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होणार आहे. विनामूल्य कोविड -१९ ची टेस्टिंग [email protected] या ईमेल अॅड्रेसवरून आलेल्या कोणत्याही ईमेलवर क्लिक करू नका.
With the pandemic’s grip tightening over the country, there are more rumours and fake emails being circulated about the same. #BankofBaroda encourages you against trusting or forwarding such emails or messages. #StaySafeBankSafe pic.twitter.com/56kseGdZJn
— Bank of Baroda (@bankofbaroda) June 21, 2020
बीओबीने आपल्या मेसेज मध्ये म्हटले आहे की हॅकर्सनी जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल अॅड्रेस हस्तगत केलेले आहेत. ते फ्रीमध्ये कोरोना चाचणीच्या नावावर ईमेल पाठवून त्यांचे वैयक्तिक आणि बँक डिटेल्स मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सचे लक्ष्य दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद येथील लोक आहेत. [email protected] या आयडी वरून हॅकर्सनी पाठवलेल्या ई-मेलवर क्लिक करून युझर्स फेक वेबसाइटवर पोहोचतात.
यानंतर या फेक वेबसाइटवर आपली वैयक्तिक किंवा बँकेच्या खात्याची माहिती दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तविक, जेव्हा युझर्स हॅकर्सना आपली वैयक्तिक माहिती देतो तेव्हा त्यांच्या बँक खात्याचा अॅकसिस मिळविणे त्यांच्यासाठी सोपे होते. अशा परिस्थितीत युझर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.