सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा सतर्क झाली असून त्याचे रुग्णालय सील करण्यात आले आहे. आता या डॉक्टरची शासकीय लॅब मध्ये चाचणी घेण्यात येणार आहे.
मिरज हि आरोग्य पांढरी म्हणून सर्व देशभर प्रसिद्ध आहे. राज्यत आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरवातीच्या काळात अनेक खाजगी रुग्णालये हि बंद होती. कोरोनाच्या भीतीने अनेक डॉक्टरांनी आपली ओपीडी बंद ठेवली होती. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये सुरु करण्यात आली. सध्या लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनेक डॉक्टरांनी आपली रुग्णालये आणि शाश्त्रक्रिया सुरु केल्या आहेत.
मिरजेतील अनेक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा सर्रास वापर केला जात आहे. मिरजेतील शिवाजी मार्ग परिसरातील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरला मंगळवारी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी खाजगी लॅब मध्ये आपल्या स्वाबची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मिरजेतील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. प्रशासनाने अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं काळताच हालचाली गतिमान केल्या. तात्काळ हॉस्पिटल सील करून डॉक्टरांच्या संपर्कातील २३ रुग्ण आणि २० कर्मचाऱ्यांचे स्वाब खबरदारी म्हणून तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांचा शोध आता घेण्याचं काम सुरु आहे. कोरोनाची लागण झालेल्या हॉस्पिटलच्या या डॉक्टरांचे निवासस्थान याच हॉस्पिटलच्या वरील मजल्यावर आहे. त्यामुळे आता तो परिसर कंटेनमेंट झोन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.