1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय क्रिकेटर्सनी अशाप्रकारे केले अभिनंदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्याच दिवशी 37 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गतविजेत्या वेस्ट इंडिजला अंतिम फेरीत 43 धावांनी हरवून पहिला विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीकांतच्या 38 धावांच्या जोरावर विंडीज संघासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले.

सर्वांना असे वाटले की विंडीज संघ हे लक्ष्य अत्यंत सहजतेने पार करेल आणि विश्वचषक जिंकण्याची हॅटट्रिक करेल, मात्र ते म्हणतात ना की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे कधीही काहीही घडू शकते.

त्या सामन्यात असेच काहीसे घडले. हेन्स, ग्रिनीज,विव्ह रिचर्ड्ससारख्या धडाकेबाज फलंदाजांनी भरलेल्या विंडीजचा संघ त्या दिवशी अवघ्या 140 धावांवर गाद झाला. या सामन्यात मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, बलविंदर संधूने दोन तर कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयामुळे भारताला जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख मिळविण्यास मदत झाली.

वर्ल्ड कपच्या या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त बीसीसीआय आणि आयसीसीसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी माजी खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

 


View this post on Instagram

 

37 years to a day that will never be forgotten

A post shared by Kapil Dev (@therealkapildev) on Jun 24, 2020 at 7:41pm PDT

 

 

 

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.