कोरोना विषाणू हवेतून पसरतो? जाणुन घ्या शास्त्रज्ञ काय म्हणतायत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेले काही महिने जगभर थैमान घातलेला कोरोना विषाणू कोणकोणत्या माध्यमातून संक्रमित होतो आहे यावर जागतिक आरोग्य संघटना संशोधन करते आहे. यामध्ये आता हा विषाणू हवेतून संक्रमित होत असल्याचे पुरावे हळूहळू समोर येत आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना या महामारीच्या तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरकोव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही कोविड-१९ च्या प्रसारणाच्या पद्धतींपैकी एक म्हणून हवा संक्रमणाच्या संभाव्यतेबद्दल बोलत आहोत.” यावेळी विषाणू संक्रमणाचा वेग वाढत असून भविष्यकाळात मृतांची संख्या वाढू शकेल असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

डॉ मायकल रायन यांनी सांगितले, एप्रिल आणि मे मध्ये दिवसाला सरासरी १ लाख रुग्ण आढळून येत होते आता ते सरासरी २ लाख असे आढळून येत आहेत. सध्या मृतांचा आकडा स्थिर असला तरी रुग्णसंख्या वाढेल तसा मृत्यूदरही वाढेल असे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक टीमने कोरोना विषाणू हवेतून कसा पसरतो याबाबतचे वैज्ञानिक कारण लवकरच प्रसिद्ध करू असे सांगितले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही यावर काम करत असून मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

२०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू हवेतून पसरतो यावर मान्यता दिल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने ते जाहीर केले आहे. या नव्या माहितीमुळे आता उपाययोजनांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. तर तांत्रिक टीमचे प्रा. बेनेडेत्ता अलीग्रॅझी यांनी हवेतून पसरण्याची शक्यता असली तरी कोरोना विषाणू हवेतून पसरतो हे निश्चित नाही असे सांगितले आहे. या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने एका पत्राद्वारे कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याची संभावना व्यक्त केली होती. त्यानंतर यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.