फायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच? फैसला उद्या..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. पण त्याही अद्याप सुरु झालेल्या नाहीत. या परिस्थितीत त्या परीक्षा होण्याची शक्यता खूप कमी आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नेमके काय करायचे यासंदर्भात उद्या दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याचे उदय सामंत यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे.

गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. परीक्षा घ्यायच्या कि नाही यासंदर्भात शासन विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करत आहे. पुणे व सोलापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेता येतील असेही मागच्या चर्चेत सांगितले होते. मात्र इतर ११ कुलगुरूंनी घेता येणार नाहीत अशी माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी या परीक्षा रद्दव्हाव्यात आणि इथपर्यंत विद्यार्थी अभ्यास करूनच पोहोचलेले असतात. तर त्यावरूनच त्यांचे मूल्यांकन केले जावे अशी मागणी त्यांच्या ट्विटद्वारे केली आहे. कोरोनाचा सर्वत्र फैलाव पाहता आणि राज्यातील तीव्रता लक्षात घेता परीक्षा घेता येण्याची शक्यता खूपच कमी आहे.

 

उदय सामंत यांच्या या ट्विटवर विद्यार्थ्यांनी सध्या परीक्षा देण्याची मानसिकता नसल्याचे म्हंटले आहे. ही  वेळ कोरोनावर काम करण्याची आहे परीक्षा घेण्याची नाही. आम्ही परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाही आहोत. अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी परीक्षेसाठी महाविद्यायात जाणे आणि तिथे राहणे यासाठी पैसे नाहीत असेही काहींचे म्हणणे आहे. तर काहीनी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या बाजूने नक्की निर्णय घेतील अशी आशाही व्यक्त केली आहे. तर अंतिम वर्ष एटीकेटीचा पण आताच निर्णय घ्या आम्हाला परीक्षा द्यायला जबरदस्ती करू नका अशाही प्रतिक्रिया आल्या आहेत. आता उद्याच्या चर्चेत काय होते त्यावर अंतिम वर्षांच्या परीक्षेचं काय हा मुद्दा कदाचित स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.