पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये निलेश राणे यांनी त्यांनी पानपट्टी चोर जा काम कर असे उत्तर दिले आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी तसे ट्विट केले आहे.

“गुलाबराव आमचे घर बघा आणि घराबाहेरचा रस्ता पण बघा. आमच्या घरा बाहेरचा रस्ता पण तुमच्या टकल्या पेक्षा चकाचक आहे, मग कळेल रस्त्यावर कोण. आमचा वॉचमन पण तुझ्या पेक्षा शिकलेला आणि रुबाबदार आहे. पानपट्टी चोर काम कर जा. ” अशा शब्दात निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले आहे. निलेश राणे त्यांची विशिष्ट भाषाशैली आणि स्पष्टवक्तेपणा याच्यामुळे चांगलेच चर्चेत राहत असतात. गुलाबराव पाटील यांनाही त्यांनी त्यांच्या विशेष शब्दात सुनावल्याचे दिसून येते.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच कोरोना संकटात सरकार अपयशी झाले आहे म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. याबद्दल गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले होते. त्याबरोबर हि आपत्ती सर्वत्र आली आहे मग उत्तरप्रदेश, गुजरात आणि दिल्ली इथेही राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे असे ते म्हणाले होते. नारायण राणे यांनी सेनेनेच रस्त्यावर आणले होते. याला निलेश राणे यांनी करकरीत उत्तर दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment