हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूचा धोका संपवण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत. यातील काही संस्थांच्या चाचण्यांमध्ये दिलासा मिळाल्याची बातमी आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठही कोरोना विषाणूच्या लसीवर काम करत आहे, हे एक मोठे यश असल्याचे मानले जात आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूविरूद्ध त्यांची ही लस ‘दुहेरी संरक्षण’ देऊ शकते. त्याच वेळी, बर्कशायर रिसर्च एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डेव्हिड कारपेंटर म्हणाले की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी वॅक्सिन ट्रायल टीम ही योग्य मार्गावर आहे आणि हे वॅक्सिन सप्टेंबरच्या सुरुवातीस उपलब्ध होऊ शकेल.
डेव्हिड कार्पेंटर यांनी सांगितले की,’ कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाविरूद्धचे हे एक मोठे यश असेल.’ लाँसेटच्या वैद्यकीय जर्नलने याची पुष्टी केली आहे की ते सोमवारी ऑक्सफोर्ड टीमच्या प्रारंभिक टप्प्यातील मानवी चाचण्यांविषयीचा डेटा प्रकाशित करतील. डेव्हिड कार्पेंटर म्हणाले, “फायनल डेट कोणीही सांगू शकणार नाही, काही शक्यता ह्या चुकीच्या असल्याचे सिद्ध होऊ शकतात मात्र सत्य हे आहे की आम्ही एका मोठ्या फार्म कंपनीसोबत काम करीत आहोत.” ही लस सप्टेंबरच्या आसपास उपलब्ध होऊ शकते आणि आम्ही या ध्येयासाठी वेगाने काम करीत आहोत.
सध्या जगभरातील आठ देश हे एकत्रितपणे कोरोना विषाणूची लस बनवण्यासाठी काम करत आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, मॉडर्ना, अॅस्ट्रा-झेनेका, कॅन्सिनो, सायनोफॉर्म यासह अनेक लसी या प्रगतीच्या टप्प्यात आहेत. त्याच वेळी, भारतातही दोन लसींच्या मानवी चाचण्या चालू आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना विषाणूच्या लसीची अपेक्षा मानवावरील प्रारंभिक टप्प्यातील चाचणीनंतर वाढली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोव्हीड -१९ च्या लसच्या शोधात त्यांना यश येईल कारण ही लस कोरोना विषाणूविरूद्ध ‘दुहेरी संरक्षण’ देऊ शकते
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.