औरंगाबाद प्रतिनिधी | एमआयडीसी’तर्फे चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात मनपा आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी आज अचानकच भेट दिली. कोविड रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा योग्य पद्धतीने मिळत आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आयुक्तांनी याठिकाणी पूर्वकल्पना न देता भेट दिली.
यावेळी पांडे यांनी येथील कोविड रुग्णांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळाले. या संवादा दरम्यान रूग्णांना उद्भवणाऱ्या अडचणींचा पांडे यांनी आढावा घेतला. तसेच आयुक्तांनी येथील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कर्मचाऱ्यांशी यावेळी चर्चा केली. त्यांच्या कामांची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.
कोरोनाग्रस्त झाल्यानंतर मनामध्ये भिती होती. मात्र कोविड केयर सेंटरमध्ये आल्यानंतर मनातील भिती नाहीशी झाल्याचे अनुभव यावेळी अनेक रूग्णांनी व्यक्त केले. यावेळी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली मुदगळकर, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.