हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणूच्या प्रतिक्रियांसाठीच्या तांत्रिक प्रमुख आणि उदयोन्मुख रोग (इमर्जिंग डिसीज) च्या प्रमुख Maria Van kerkhove यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोणतीही लक्षणे नसणाऱ्या लोकांकडून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याच्या घटना दुर्मिळ आहेत. विविध देशांच्या सतत संपर्कात राहून आम्ही ही माहिती मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले. असे काही देश आहेत जे अगदी तपशिलात जाऊन काम करत आहेत. त्यांच्याकडून कोणतीच लक्षणे नसणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आम्ही घेत आहोत मात्र अशा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण झाल्याचे फारसे दिसून आले नाही असे त्यांनी सांगितले.
लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे सर्व संपर्क तपासण्याचे काम काही देश करत आहेत. आम्ही त्या सर्व डाट्यावर खूप लक्षपूर्वक काम करत आहोत. मात्र अद्याप अशा व्यक्तींमुळे दुसऱ्या कोणाला विषाणू संक्रमण झाले नसल्याचे समोर आले आहे. हे खूपच दुर्मिळ आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांपर्यंत जाऊन आम्ही माहिती घेतली असता त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती काहीतरी सौम्य आजार होते हे दिसून आले असे त्यांनी सांगितले. त्यांना अद्याप ताप आला नव्हता, त्यांना कोणत्याच प्रकारची सर्दी झाली नव्हती अगदी श्वास घेण्यातही त्रास होत नव्हता. पण काहींना सौम्य आजार होते. असे काही रुग्ण सापडले आहेत ज्यांना ठराविक लक्षणे दिसून आली नाहीत पण सौम्य आजार होते.
Coronavirus spread by people with no symptoms ‘appears to be rare’: WHO
Read @ANI Story | https://t.co/JJAbYpiTkG pic.twitter.com/BOTfNxAaDe
— ANI Digital (@ani_digital) June 9, 2020
एप्रिल महिन्याच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, लोकांना लक्षणे दिसून आल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते संक्रमण करण्याची सुरवात करू शकतात. यूएस रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र यांनी देखील असा अंदाज व्यक्त केला आहे की ४०% कोरोना विषाणूचे संक्रमण हे आजारी असण्याची लक्षणे असल्यावर होऊ लागते. थोडक्यात आपण असे संपर्क शोधले जे कोणतीही लक्षणे न दाखविलेल्या कोरोना विषाणू संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत आणि त्यांना विलगीकरणात ठेवले तर आपण ही साखळी तोडू शकतो. दरम्यान जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७० लाख पार झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.