हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून अजित पवार यांची स्तुती केली आहे.
निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या या तातडीने निर्णय घेण्याच्या तसेच परिस्तिथी हाताळण्याच्या कौशल्याचे कौतुक करत ट्विट केले आहे की, “जसं पुण्यात अजित दादांनी केलं त्याला म्हणतात परिस्थिती आणि प्रशासन हाताळणं.” यासोबतच त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग च्या पालकमंत्र्यांना टोलाही मारला आहे. ते म्हणाले, “नाहीतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री. रत्नागिरीचा पालकमंत्री दिसत नाही आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री कधी कधी दिसतो पण काही कामाचा नाही.”
जसं पुण्यात अजित दादांनी केलं त्याला म्हणतात परिस्थिती आणि प्रशासन हाताळणं नाहीतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री. रत्नागिरीचा पालकमंत्री दिसत नाही आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री कधी कधी दिसतो पण काही कामाचा नाही. https://t.co/8qLr99Umjo
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 5, 2020
निलेश राणे यांच्याकडून अजित पवार यांचे असे जाहीर कौतुक झाल्याने बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तशा प्रतिक्रियाही देण्यात आली आहेत. दरम्यान चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलिस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे अजित पवार यांनी जाहीर आभार मानले आहेत. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.