मुंबई । सर्व ठिकाणी कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अगदी तो बॉलिवूड कलाकारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री म्हणून प्रख्यात असणाऱ्या रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. परंतु रेखा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला आहे.
रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण होताच त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा रक्षकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार रेखा यांची पण चाचणी करण्यात येणार होती. परंतु पालिकेचे कर्मचारी यांना रेखा यांच्या बंगल्याच्या गेट वरूनच परतावे लागले. मुंबई महानगर पालिकेने त्यांचा बंगला सील केला आहे. आणि आजूबाजूचा परिसर सॅनिटाइज करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावला आहे.
रेखा तसेच त्यांचे मॅनेजर आणि तीन कर्मचारी यांच्या कोरोना चाचणीसाठी पालिकेचे कर्मचारी बंगल्यावर पोहचले होते. परंतु बंगल्याचा दरवाजा कोणीच उघडला नाही. उलट त्यांचे मॅनेजर फरझाना यांनी आतून आवाज देत बंगल्याच्या फोनवर कॉल करण्यास बोलायला सांगितले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॉल केला असता, रेखाजींची तब्बेत ठीक आहे. त्या कोणाच्याही संपर्कात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना ची चाचणी करण्यात सारस्थ नाही असं ते म्हणाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तसेच माघारी फिरावे लागले. मुंबई मधील वांद्रे बस स्थानक परिसरात “सी स्प्रिंग” हा बंगला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.