मुंबई । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला होता. मात्र राज्याचे राज्यपाल भारतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयावर आक्षेप घेत परीक्षा घेण्यास सांगितले आहे. यावर आता महाराष्ट्र पदवीधर संघटनेने राज्यपालांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे अशी मागणी याद्वारा करण्यात आली आहे.
राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलगुरूच आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी वर्गाच्या मागण्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असे आवाहन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमित कोळेकर यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्याच्या हिताच्या काही मागण्या राज्यपाल कोश्यारी यांच्या समोर ठेवल्या आहेत.
महाराष्ट्र पदवीधर संघटनेने याबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हंटले आहे तसेच पालकांनी विद्यार्थ्याना कोणाच्या जिम्मेदारी वर पाठवावे हे राज्यपालांनी स्पष्ट करावे व त्याची जबाबदारी स्वतः घ्यावी, विद्यार्थ्यांच्या प्रवासाची राहण्याची , खाण्याची सोय राज्यपालांनी व्यक्तीत खर्चातून करावी, प्रत्येक विद्यार्थ्याला १ कोटीचे विमा कवच द्यावे, देव न करो पण एकाध्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली व तो दगावला तर त्याच्या परिवाराची पूर्ण जबाबदारी राज्यपालांनी घ्यावी. अशा मागण्या केल्या आहेत.
राज्यपालांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून परीक्षा घेण्यास सांगितले आहे. पदवीधर संघटनेने त्यांच्या या आक्षेपावर खेड व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीत परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी म्हंटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.