आता बसा बोंबलत; गडचिरोलीत विलगीकरण कक्षातून पळून गेले ५० मजूर; जिल्ह्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर असलेल्या यवली गावातून ५० मजूर विलगीकरण कक्षातून पळून गेले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरची आतुरता असल्याने या मजुरांनी नियम धाब्यावर बसवत दवाखान्यातून पळ काढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढते आहे. मुंबई पुण्यासारखे जिल्हे रेड झोन मध्ये आहेतच पण महाराष्ट्रातील इतर … Read more

शहरांपासून कोसो दूर जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कोरोनाचा काय परिणाम होतोय?

#CoronavirusImpact | विकास वाळके जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, कोरोना भारतात ही झपाट्याने पसरताना दिसतोय. विषाणुचे गांभीर्य कळायच्या आत एक अंकी आकड्यावरून आपण चार अंकी संख्या गाठली आहे आणि दिवसेंदिवस त्यात झपाट्याने वाढ होतच आहे. सुरुवातीला पुणे-मुंबई मध्ये पसरलेल्या या विषाणुने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या अपुरेपणामुळे विषाणु मोठ्या प्रमाणात … Read more

अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित

गडचिरोली प्रतिनिधी । पंतप्रधानांनी मागील वर्षापासून संपुर्ण भारतात शेतकर्‍यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरु केली.या अंतर्गत थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सरळ तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार प्रमाणे १२ महिन्यात सहा हजार रुपये जमा करण्याची महत्वकांक्षी योजना आणली. मात्र, अधिकारी वर्गाच्या उदासिन भुमिकेमुळे शेतकर्‍यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचीत असल्याने … Read more

शेखर सिंह सातार्‍याचे नवे जिल्हाधिकारी, श्वेता सिंघल यांची बदली

सातारा प्रतिनिधी | शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली अाहे. सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकिय सेवेच्या १९ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढले. यामध्ये गडचिरोली येथे कार्यरत असलेले शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शेखर … Read more

नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्यास्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी(५५) व ऋषी मेश्राम(५२) अशी मृतांची नावे आहेत. मासु पुंगाटी हे गाव पाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, वनविभागाच्या हत्ती कॅम्पला विरोध दर्शवत केली तोडफोड

पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत.तर अल्लापल्ली-भामरागड आणि कमलापूर-दामरंचा या दोन्ही मार्गावर झाड तोडून रस्ता अडविला आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.

तब्बल ३१ लाखांचे बक्षिस नावावर असणाऱ्या जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मअसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आल्यामुळं माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतच एकुण ३१ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या एकुण सहा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. माओवाद्यांनी ना. पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र मा. महादेव तांबडे, मा. पोलीस अधीक्षक गडविरोली श्री शैलेश बल्कवडे सा. यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यामध्ये १ पुरुष आणि पाच महिला माओवादयांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक गडविरोली शैलेश बल्कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये संदीप उर्फ महारू चमरू वड्डे, मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनराव कुरचमामी, स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला, अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी, ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो आणि तुलसी उर्फ मारे सन्नू कोटामी यांचा समावेश आहे.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे. पोलीस दलाचे सी-60 … Read more