म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

गावात पाणीप्रश्नावरून प्रहारने जाळल्या सरपंच उपसरपंचाच्या खुर्च्या; प्रश्न मिटला नाही तर गावबंदी करण्याचा इशारा (Video)

Burning Chairs

औरंगाबाद प्रतिनिधी | फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील गावकऱ्यांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतरही सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी पदाधिकारी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या खुर्च्या जाळण्याचा प्रकार घडला आहे. प्रहार युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे यांनी हे कृत्य केले आहे. फेसबुक लाईव्ह करुन साबळे यांनी हे कृत्य केल्याने एकच … Read more

धक्कादायक !! MBBS चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद येथील शासकिय महाविद्यालयात एम.बी.बी.एस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने आत्महत्या केल्याचे समजत आहे. यश नरसिंगराव गंगापूरकर असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थाचे नाव आहे. औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. विष प्राशन करून यशने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास … Read more

धक्कादायक !! प्रियकरासोबतचे अश्लिल फोटो चक्क पती आणि दिरानेच केले व्हायरल

औरंगाबाद | विवाह झाल्यानंतरही प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे अश्लिल फोटो पतीच्या मोबाईलमध्ये काढले. मोबाईलमधून डिलीट केलेले फोटो पतीने पुन्हा रिकव्हर केले. हेच फोटो पती व दिराने पत्नीच्या मामासह इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. याचा राग आल्यामुळे विवाहितेने पती, दिरावर फोटो व्हायरल तर प्रियकरावर थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत पोलिसांना आत्महत्येची धमकी दिली. … Read more

आरटीओ निरीक्षकाच्या मुलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना अरेरावी ; तरुणाला सिडको पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद । वाद मिटविण्यासाठी जिल्हाधिकारी गाडीतून बाहेर उतरून तरुणाला संमजविण्यासाठी गेले, असता तरुणाने चक्क जिल्हाधिकारी आणि त्यांचा सोबत असलेल्या अमलदारालाच अरेरावीची भाषा केली. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ च्या सुमारास आंबेडकरनगर भागात घडली. तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शशांक अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक … Read more

आयुक्त पांडेय यांची सायकल सवारी ; सायकल चालवत पोहचले महानगरपालिकेत

औरंगाबाद । महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे ‘ सायकल टू वर्क डे ‘ या संकल्पनेनुसार आज सायकलवर कार्यालयात पोहोचले. आपल्या दिल्ली गेटवरील जलश्री या निवासस्थानावरुन सायकलवर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. येथील एक बैठकीत ते उपस्थित होते. बैठक संपल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय ते औरंगाबाद महानगरपालिका मुख्यालय, टाऊन हॉलपर्यंत पांडेय यांनी सायकलवर प्रवास केला. सायकल्स … Read more

कोर्टाच्या आवारातच पती ने केली पत्नीची भोसकून हत्या

murder

औरंगाबाद प्रतिनिधी | पोटगी मिळालेल्या पत्नीने जमिनीचा ताबा मिळावा यासाठी सुरु असलेल्या दाव्याचा वादावरून वृद्ध इसमाने वयोवृद्ध पत्नीला धारदार चाकूने सपासप वार करून कोर्टाच्या आवारातच जीवे मारून टाकल्याच्या घटनेने शनिवारी शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेटसमोर हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी पतीसह तिचा सावत्र मुलगा, नातू व एका अनोळखी … Read more

धक्कादायक! मुलगी झाल्याचे समजून जन्मदात्या आईने अवघ्या चार तासांचा मुलगा फेकला झुडुपात

Newborn child

औरंगाबाद प्रतिनिधी | पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक झुडुपात फेकले. मात्र, हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ‘ते’ आमचेच असल्याचा दावा या दाम्पत्याने केला. ही घटना वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात घडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी.एन.ए … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

thumbnail 1531556716003

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने … Read more