करोनाबाधित मृतकाच्या पत्नी-मुलाला करोनाची लागण; अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता खबरदारी म्हणून या दोघांनाही … Read more

अजिंठा-वेरूळ पर्यटनाला करोनाचा फटका; ७ एप्रिलपर्यंत लेण्या बंद

औरंगाबाद प्रतिनिधी । देशात करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत. करोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरूळ लेण्यासोबतच ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय … Read more

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील … Read more

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती … Read more

लढा करोनाशी! भारताने जर्मनीला दिली तब्बल १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणघातक करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. सरकार लवकरच देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही लवकरच चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी जर्मनीकडून १० लाख टेस्टींग किट मागवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या … Read more

करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यभरात होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर गेल्या आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलं आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. … Read more

करोना साईडइफेक्ट: केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावा, नाहीतर..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पूर्वकाळजी म्हणून खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याचे तसंच इतरांना घरुन काम करण्याची मुभा देण्याचे आदेश मुंबई मनपाने दिले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत आदेश देत सदर आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल असा … Read more

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये लोकांची वर्दळ पाहता खबरदारी म्हणून इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने पुढील १५०० तासांसाठी भाविकांना मंदिर प्रवेश बंद केला आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांच्या मंदिर प्रवेशावर बंदी घातल्याचे शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे … Read more

राज्यसेवा पूर्वपरीक्षा ५ एप्रिल रोजीच, आयोगाची माहिती

५ एप्रिल २०२० रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.

करोनाने घेतला महाराष्ट्रात पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय करोनाग्रस्त व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज उपचार घेत असलेल्या या करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेली व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर … Read more