नथुराम गोडसेंच्या भक्तांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये – भूपेश बघेल

भाजप आरएसएसचा राष्ट्रवाद मुसोलिनी, हिटलरच्या विचाराने प्रेरित दुटप्पी राष्ट्रवाद असून नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी नांदगाव पेठ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते “चला हवा येउ द्या ” फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत. रविवारी सकाळी अमरावती शहरातील साई नगर, गोपाळ नगर, गणेश कॉलनी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसह बंड यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमधे मराठी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी सहभागी होऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रीतीताई बंड यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.

बंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार? श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावता; मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल

मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या तीन तलाक तसेच आर्टिकल ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खासदार नवनीत राणा यांनी संसदेत समर्थन करणे आम्हाला पटले नसून, विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत असणार नाही, या शब्दांत आमदार रवी राणा यांच्या विरोधात स्थानिक मुस्लीम समुदायाने रोष व्यक्त केला आहे.