औरंगाबादेत खुनांची मालिका सुरूच; मुकुंदवाडीत दोन दिवसांत दोन महिलांची हत्या

Murder

औरंगाबाद – शहरात खूनाची मालिका संपता संपत नसल्याचं चित्र आहे. मुकुंदवाडी परिसरात दोन दिवसांत दोन महिलांचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याता 22 वर्षीय युवती आणि 39 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. यातील युवती सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती, मात्र नंतर घरी परतलीच नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगर भागातील मोकळ्या मैदानात तिचा मृतदेह आढळला. यातील 22 … Read more

क्रांती चौकात नवाब मालिकांचा पुतळा जाळला; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

bjp

औरंगाबाद – नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरु आहेत. औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज क्रांती चौकात दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. … Read more

कन्नड घाट जड वाहतुकीसाठी खुला

darad

औरंगाबाद – कन्नड तालुक्यात ३१ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड घाटात दरडी कोसळून वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. तब्बल अडीच महिन्यांनी हा रस्ता जड वाहतुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून खुला करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे ३१ ऑगस्टला आठ ठिकाणी दरडी कोसळून रस्ता खचला. घाटाची मोठी हानी झाली. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता … Read more

संपाच्या तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा !

st

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रविवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला … Read more

लेबर कॉलनी प्रकरण- पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणाव

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची 20 एकर जागा ताब्यात घेण्यावरून आज चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. कारवाईविरोधात नागरिक पुन्हा न्यायालयात गेल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाल्याने प्रशासनाची आजची कारवाई टळली आहे. दरम्यान, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रशासनाने पथक पाडापाडी करण्यासाठी दाखल होताच इतर नागरिक आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही … Read more

अवघ्या काही मिनिटांत प्राध्यापकाची दीड लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक

Facebook Fraud

औरंगाबाद – क्रेडिट कार्टची लिमिट वाढवण्याच्या नावाखाली आलेल्या लिंकवर माहिती भरताच एका मुख्याध्यापकाच्या खात्यातून 1 लाख 45 हजार 662 रुपये अवघ्या काही मिनिटात गायब झाले. मात्र, सायबर क्राईमच्या तत्परतेने ही रक्कम भामट्याच्या खात्यात परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील रहिवासी मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांनी होम लोन घेतल्याने त्यांच्या खात्यावर … Read more

औरंगाबादेत पुन्हा एका महिलेवर धावत्या रिक्षातून उडी मारण्याची वेळ

Crime

औरंगाबाद – शहराजवळीलच कामगार चौक ते वाळूज रस्त्यावर रात्रीच्या वेळी रिक्षातील महिलेच्या गळ्याला चाकू लावत लुटण्याचा प्रयत्न झाला. अंगावर स्प्रे मारुन बेशुद्ध करण्यात येत असल्याचे लक्षात येताच महिलेने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेत महिला जखमी झाली, मात्र त्यानंतर रिक्षाचालक व सहप्रवाशी म्हणून बसलेले चोरटे पसार झाले. ही थरारक घटना कामगार चौक ते वाळूज रस्त्यावर … Read more

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज औरंगाबादेत; मनपा निवडणुकीची आखणार रणनीती

mim

औरंगाबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे शुक्रवारी औरंगाबाद शहरात आगमन झाले. आज शनिवारी खुलताबाद येथे एमआयएमच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात काय रणनिती आखायची यावर या बैठकीत चर्चा होत आहे. दरम्यान, काल शुक्रवारी असदुद्दीन ओवैसी यांचे औरंगाबादेत आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी … Read more

अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची काल मुक्तता; आज चित्र ‘जैसे थे’

atikraman

औरंगाबाद – शहरातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पैठण गेट परिसरात असंख्य लहान-मोठी दुकाने थाटलेली आहेत. मात्र पैठण गेटभोवतीच अनेक हातगाड्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी पैठण गेट सभोवतालचे हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. याप्रकरणी पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी … Read more

खळबळजनक ! भांडण सोडवण्यास गेलेल्या दामिनी पथकावरच हल्ला

police

औरंगाबाद – शहरात कुठेही महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या दामिनी पथकाला वेगळाच अनुभव आला. नेहरू उद्यान परिसरातील भांडण सोडवण्यास गेलेल्या या पथकावरच भांडणाऱ्या महिलांनी हल्ला केला. त्यामुळे बुधवारी या ठिकाणी मोठा गोंधळ उद्भवला. अखेर काही वेळानंतर पोलिसांना आणखी फौजफाटा मागवावा लागला आणि या दोन आक्रमक तरुणींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more