गेल्या पाच निवडणुकांत भाजपने खर्च केले तब्बल १२०० कोटी रुपये

टीम हॅलो महाराष्ट्र। एखाद्या पक्षाला निवडणूकसाठी नेमके किती पैसे लागतात याबद्दल डोळे विस्फारून टाकणारी माहिती समोर आली आहे. भाजपने निवडणूक प्रचारासाठी तब्बल १२०० कोटी खर्च केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यात मागील वर्षी लोकसभा आणि चार राज्यांच्या निवडणूका यांच्या प्रचारासाठीचा केल्या गेलेल्या खर्चाचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या निवडणुका किती खर्चिक … Read more

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीचे चित्र नोटांवर छापा; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला सल्ला

टीम हॅलो महाराष्ट्र : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे, असा अजब सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी सरकारला सांगितला आहे. मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोलत होते. इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशचा पुतळा छापल्याच्या बातमीविषयी पत्रकारांनी विचारले असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले की, ‘मी म्हणतो की आपल्या नोटांवर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र … Read more

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं. 

लोकशाही आहे म्हणून शांत, नाहीतर त्या गोयलला दाखवलं असत राजेशाही काय असते – उदययनराजे

टीम हॅलो महाराष्ट्र : लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते, असे ट्विट करत भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत … Read more

होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच; उदयनराजेंच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई : होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच. हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारे शरद पवार एकमेव आहेत, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजाची उपमा तुम्ही एखाद्याला देत असता तेव्हा विचार करून बोलायला हवे, अशी टीका उदयराजेंनी पवारांवर केली होती. … Read more

सावरकर-गोडसेंबाबत अपशब्द वापरले गेले तेव्हा राऊत गप्प का बसले? – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी,सतेज औंधकर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसे यांचे शारीरिक संबंध होते असे सांगण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी ट्विट का केले नाही? असे सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले. तसेच … Read more

शिवसेनेचे नाव ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजेंचे टीकास्त्र

मुंबई : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर भाष्य केले. यावेळेस त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, अशी टीका उदयनराजे यांनी केली. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा … Read more

समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण…

पुणे | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कौशल्य महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकितही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवत जोरदार बँटींग केल्याने भाजपच्या सर्वाधिक जागा निवडुन आल्या. फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा डायलाॅग तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंडिंगला आहे. मात्र फडणवीसांकडे असे वक्तृत्व कौशल्य कसे आले यावर आता खुद्द फडणवीस … Read more

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पुन्हा चंद्रकांत पाटील?

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी येत्या १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी निवड होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. पक्षाची सत्ता असताना भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची रांग लागली होती. मात्र आता विरोधी बाकावर असताना अनेक … Read more