मानलं पवार साहेब ,एका वाक्यात कान टोचले आणि कानफटीत पण दिली ; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

Sharad pawar Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाना स्वबळावर सत्ता मिळवण्याचे आवाहन केल्यानंतर स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मानलं पवार साहेब, एका दिवसात वर्षभराची उतरून टाकली. एका वाक्यात कान टोचले, अशा शब्दांत भाजप … Read more

मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठीत , खरं सरकार कुठे आहे ते कलर्सला पण माहीत आहे ; मनसेचा शिवसेनेला टोला

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कलर्स मराठी वरील बिग बॉस मध्ये जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा … Read more

बीपी, शुगर वाढली की राणे काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही ; अब्दुल सत्तारांनी राणेंना फटकारले

Rane and Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे पुळचत आहेत, बाळासाहेबांच नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. असा घणाघात राणेंनी केला होता. तसेच आमच्या वाट्याला गेलात तर मातोश्री वरील सगळं काही बाहेर काढेन असा इशारा सुद्धा दिला होता. राणेंच्या या … Read more

‘ते’ भाषण नक्की दसरा मेळाव्याचं होतं की शिमग्याचं?? ; चंद्रकांत पाटलांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा निमित्ताने रोखटोख भाषण करत हिंदुत्वावरून आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरेंच्या या भाषणाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी … Read more

हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना पण कळणार नाही ; रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले होते. राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, रामदास आठवले यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. हे सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक … Read more

उद्धव ठाकरे पुळचट माणूस, बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी नाही – नारायण राणेंची जहरी टीका

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलतांना नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्रांवर सडकून टीका केली होती.त्या टिकेलाच उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खास पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी बोलतांना राणे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे,काही कामाचा नाही हा माणूस, खरं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायची … Read more

उद्धव ठाकरे हे पिंजऱ्यातला वाघ की पिंजऱ्याबाहेरचा ?? – नारायण राणेंचा घणाघात

Narayan Rane Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळावा दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा नारायण राणेंनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात, वाघ पिंजऱ्यातला की पिंजऱ्याबाहेरचा? असा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. मोदींच्या नावावर निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांसोबत हातमिळवणी केली ही भूमिका वाघासारखी नसून गांडुळासारखी झाली. या … Read more

उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंचा हल्लाबोल

मुंबई । ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली,” अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला … Read more

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंची लायकीच नाही ; नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं अशी टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची शेलकी टीका

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आशिष शेलार यांनी आज … Read more