हाऊ इज द जोश !!! एम्स मधील कोरोना चाचणीसाठी १०० स्वयंसेवकांची गरज, १००० हुन अधिक जण तयार

मुंबई । मार्चमध्ये राज्यात सगळीकडे लॉक डाउन ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉक डाउन चा कालावधी दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील सारे शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी आटोकाट मेहनत घेत आहेत. भारतातील अनेक संस्था त्याच्या तयारीला लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लसीच्या बाबतीत चांगली बातमी आली .त्या अनुषंगाने एम्स रुग्णालयाने मानवी चाचणी घेण्याचा विचार केला आहे. १०० स्वयंसेवकांची … Read more

सरकारचा नवा नियम; कोरोना टेस्टसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आता गरज नाही

मुंबई । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी (Corona Test) मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी घेण्यास बराच विलंब होत असल्याचे आयसीएमआरचे म्हटलं आहे. आयसीएमआरने … Read more

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची होणार कोरोना टेस्ट; गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या बैठकीत होते उपस्थित

नवी दिल्ली । दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्बेत खालावली असून मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळं सत्येंद्र जैन यांची कोरोनाची टेस्टही झाली आहे. त्यांच्या टेस्टचा अहवाल लवकरच येईल. Due to high grade fever and a sudden drop of my … Read more

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी … Read more

अरविंद केजरीवालांचा कोरोना टेस्टचा अहवाल आला आणि..

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे केजरीवाल यांनी कालपासून स्वत:ला आयसोलेट करुन घेतले होते. त्यांच्या सर्व नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली होती. या टेस्टचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता अरविंद केजरीवाल कोरोना टेस्ट नेगेटिव्ह … Read more

अरविंद केजरीवालांची तब्बेत बिघडली; उद्या कोरोना टेस्ट होणार

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होते. या लक्षणांमुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर … Read more

राज्यात कोरोना टेस्टचा दर निश्चित होणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी मनमानीपणे शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती कोरोना चाचणीचा दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लॅब पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी आणि … Read more

अन.. ‘त्या’ प्रश्नावर ट्रम्प संतापले; पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय

वृत्तसंस्था । अमेरिकेत करोनाचा संसर्ग थैमान घालत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील चर्चेत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका आशियाई महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांना संताप अनावर झाला व “हा प्रश्न मला नाही, तर चीनला विचारा,” असं म्हणत पत्रकाराच्या प्रश्नावर भडकून ट्रम्प पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने … Read more

मनमोहन सिंग यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला..

नवी दिल्ली । दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांना अचानक ताप आला तसेच अस्वस्थही वाटू लागलं होतं. त्यामुळे तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नव्या औषधांची रिअक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली होती, सध्या त्यांची … Read more

टेस्टिंग किट विक्रीतून नफेखोरी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना काही लोक मात्र नफेखोरी करण्यास चुकत नाही आहेत. अशा भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते, घृणा निर्माण होते, अशा तीव्र भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील नफेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केंद्राला केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही, असेही राहुल … Read more