कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सहस्त्रक; आतापर्यंत 1012 रुग्ण बरे तर आज 45 रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 1012 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

चीनी सरकारने Air India च्या विमानांना हॉंगकॉंगसाठी उड्डाण करण्यास घातली बंदी, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली सरकारने हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीनी सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाची विमाने हॉंगकॉंगला गेली नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणेही दिल्लीत आली नसल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे. … Read more

शरद पवारांचा कोरोना चाचणी अहवाल आला निगेटिव्ह; पुढील ४ दिवस कुणालाही न भेटण्याचा घेतला निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गाची भीती झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यात विविध भागांत दौरे करत असतानाच पवार यांच्या सुरक्षा ताफ्यातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलताना माहिती दिली. शरद पवार यांची रॅपिड अँटिजेन … Read more

गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल आला..

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते. त्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. अमित शाह यांनी स्वतः आपल्या कोरोना चाचणीचा अहवालाबाबत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. अमित शाह यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी … Read more

गेल्या 1 महिन्यामध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी हेल्थ इंश्योरेंस क्लेम करणार्‍या लोकांची संख्या 240% वाढली, काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ ची प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दरमहा ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस वरील उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या हेल्थ क्लेमची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार, सर्व सामान्य विमा कंपन्यांची … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

कोरोना टेस्ट कमी केल्यानं आपण काय कमावलं आणि काय गमावलं? काय म्हणते फडणवीसांची आकडेवारी

मुंबई । महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी कोरोना चाचणीवरून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आकडेवारी जरी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली एक आकडेवारी जारी केली आहे. देवेंद्र फडणवीस … Read more