घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड, 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली, मिरजेसह कुपवाड एमआयडीसी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. तिघांच्या टोळीकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. श्रीशैल राम राजमाने, अनिस अल्ताफ सौदागर आणि अक्षय लक्ष्मण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे … Read more

बाजारात लुटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला पोलिसांकडून अटक, आणखी दोघी पसार

सांगली |  प्रथमेश गोंधळे । सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच बस स्थानकावर महिलांचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या टोळीचा सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी सांगलीतील एका महिलेस अटक करण्यात आली असून तिच्या अन्य दोन महिला साथीदार पसार झाल्या आहेत. सोनू हरी काळे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून … Read more

16 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार अन् नंतर खून, क्रुर आई वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी ‘असं’ पकडलं

सोलापूर | बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका मजुराने आपल्याच सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारानंतर वडील अन् आईनेच सदर मुलीचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद … Read more

मिरजेत पोलिसांकडून 33 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

सांगली । कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला गुटखा घेऊन चाललेल्या आयशरला मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरज-सांगलीरोडवरील हॉटेल राजधानीसमोर सापळा रचून पकडले. यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये भुसा ठेवलेल्या पोत्याच्या पाठीमागे 33 लाखांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी गुटखा व आयशर ट्रक असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वाहन चालक दाऊल … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी, हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने … Read more

18 घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

सांगली | सांगलीसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून तब्बल १८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. जिज्या उर्फ जितेंद्र महिम्या काळे आणि अनश्या उर्फ अनुशेठ गुरुपद भोसले असे अटक करण्यात आलेल्यांची नावे … Read more

जमिन माझ्या नावावर कर..दारुड्या मुलाने केला वडीलांचा खून

सांगली | जमीन वादातून दारुड्या पोराने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना जत जवळील जाधव वस्तीवर मंगळवारी सायंकाळी घडली. या खूनप्रकरणी कृष्णा केशव जाधव यास जत पोलिसांनी अटक केली आहे, जतपासून दोन कि.मी. अंतरावर तंगडी वस्तीशेजारी असलेल्या जाधव वस्तीवर ही घटना घडली आहे. केशव तात्यासो जाधव व त्यांचा मुलगा कृष्णा केशव जाधव हे दोघे एकाच … Read more

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आईसह तिच्या प्रियकरास अटक; पं.स. सदस्याला बेड्या

सांगली | स्वतःच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केलेली आई प्राची सुशांत वाजे व तिचा प्रियकर पंचायत समिती सदस्य अमरसिंह विश्वासराव पाटील या दोघांना आष्टा पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉरच्युनर गाडी जप्त केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. … Read more

अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परप्रांतीय नराधमास 20 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

सांगली प्रतिनिधी । एमआयडीसीमध्ये सहकारी कामगार मित्राच्या एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम परप्रांतीय कामगारास 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बलरामकुमार रामविलास गौतम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि 2018 साली विमल सिमेंट पाईप कंपनीत घडली. … Read more

प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला पोटच्या मुलाचा काटा

सांगली प्रतिनिधी । अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या साडेतीन वर्षांच्या मुलगा मनन सुशांत वाझे याचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील याच्या मदतीने मननची आई प्राची सुशांत वाजे यांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह … Read more