ट्रकला दुचाकीची धडक; पती – पत्नी ठार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे ट्रक आणि दुचाकी यांच्यातील भीषण अपघातात परभणी येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. दवाखान्यात मोटारसायकल वरून परभणी येथे जाणाऱ्या दांम्पत्याची गाडी समोरील ट्रकवर धडकून झालेल्या भिषण अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथून भागवत बापुराव गोंगे वय २७ वर्षे हे आपल्या पत्नी आरती भागवत गोंगे वय … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Mumbai: 12 dead and 13 injured after a wall collapsed on hutments in Pimpripada area … Read more

राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेंचे निधन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव शिंदे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज पहाटे आष्टा येथे निधन झाले. गेली अनेक महिने ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर आष्टा येथे मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक … Read more

विजेचा शॉक लागून पोलिसाच्या तरुण मुलीचा मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर येथे पोलीस वसाहतीत राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचा वीजेचा शाॅक लागून मृत्यू झालाय. अहमदनगर पोलीस मुख्यालयात सदर घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीय. हाती अालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासूब नगर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे घरावरील पत्रे व भिंतींत करंट उतरला होता. वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी पूजा सुनील कुरहे हीला … Read more

उपचार वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु

मायणी प्रतिनिधी | महेश जाधव अनफळे तालुका खटाव येथील मारुती राम आडके वय ७० रा अनफळे यांचा शनिवारी सायंकाळी ८:३० वाजण्यासुमारास सर्पदंशाने मृत्यु झाला असल्याची घटना घडली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.त्यामुळे नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच वैद्यकीय अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, घरातील कर्ता माणूस दगावल्याने होणारी नुकसान भरपाई … Read more

शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

गडचिरोली प्रतिनिधी | विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ … Read more

जावळीत २३ वर्षीय महिलेचा पाण्याने घेतला बळी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील जावळी तालुका दुष्काळाने होरपळला आहे. अशात वेळे ढेन या गावातील एका २३ वर्षीय महिलेचा पाण्याने बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. स्वाती भगवान कोकरे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव अाहे. वयाच्या २३ व्या वर्षी असं मरण आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नळ पाणीपुरवठा योजना तोकडी पडत … Read more

बलगवडेत मुलास पोहायला शिकवायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील आरवडे येथील अमित वाघ हे आपल्या लहान मुलास पोहायला शिकवत असताना बलगवडे येथील विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अमित हे सकाळी नातेवाईकांसह बलगवडे -आरवडे रोडलगत कापूर ओढ्याकाठी असणाऱ्या विहिरीत लहान मुलास पोहायला शिकविण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानकपणे ते विहिरीत पडले. विहिरीत ४० ते ५० फूट पाणी असल्यामुळे … Read more

एका दिवसात तीन जणांच्या आत्महत्या, भावी नवरदेवासह अज्ञात वृद्धेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलीसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील उस्मानपुरा भागातील २० वर्षीय तरुणाने व बजाजनगर येथील वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर फुलंब्री येथील एका रुग्णालयामागे एका 65 वर्षीय अज्ञात वृद्ध महिलेने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रोहित गौतम रुपटक्के(वय 20 वर्षे, रा. मिलिंदनगर,उस्मानपुरा), परमेश्‍वर रघुनाथ मरकंटे (वय 39 वर्षे, मूळ गाव भोकसखेडा, ता. देगलूर, जि. … Read more