कोरोना काळात ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी चांगली बातमी, जुलैच्या तुलनेत निर्यातीत 29.18% झाली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून रत्ने व दागिन्यांची निर्यात जुलैच्या तुलनेत 29.18 टक्क्यांनी वाढून 13,160.24 कोटी झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) शनिवारी ही माहिती दिली. अमेरिका, चीन, युरोप आणि इतर देशांकडून मागणी वाढल्यामुळे रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीत आता सुधारणा झाली आहे. जुलैमध्ये रत्ने व दागिन्यांची निर्यात 10,187.04 कोटी रुपये किंवा 135.85 दशलक्ष … Read more

सरकारचा मोठा निर्णय- चीनसह ‘या’ देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीवर घातली बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी केंद्र सरकारने कलर टेलिव्हिजनच्या (Color Television) आयातीवर बंदी घातली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि आवश्यक नसलेली वस्तूंची आयात कमी करणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आता कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांचे आयात धोरण मुक्त श्रेणीतुन … Read more

जगभरातील लोक भारतातून हळद मागवत आहेत! आता आपणही याद्वारे कमवू शकता लाखो रुपये

जगभरातील लोक भारतातून हळद मागवत आहेत! आता आपणही याद्वारे कमवू शकता लाखो रुपये #HelloMaharashtra

सोन्याच्या वायदा किंमती रेकॉर्ड स्तरावर; जाणुन घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारताच्या सोने बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.  सुरुवातीच्या व्यापारात भारतात सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ४८,८७१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. अशाप्रकारे २०२० मध्ये सोन्याच्या वायद्याच्या किंमतीमध्ये आतापर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोन्याच्या वायदा … Read more

म्हणून पाकिस्तान चीनला पाठविणार ८० हजार गाढव  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख … Read more