भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदी घेणार आज सर्वपक्षिय बैठक

नवी दिल्ली । चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. … Read more

चीनला अद्दल घडवण्यासाठी एकदा आरपारची लढाई होऊन जाऊ द्या!- रामदास आठवले

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाल्यांनतर देशात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. चीनची आर्थिक कोंडी … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

..म्हणून चीनने लपवला आपल्या मृत सैनिकांचा आकडा

पेईचिंग । भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. दरम्यान, काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. तणाव वाढवायचा नसल्यामुळे आकडा जाहीर करणार नसल्याचं चीनने म्हटलं आहे. पण आता चीनबाबत … Read more

चीनच्या ग्लोबल टाइम्सने भारताला दिला ‘हा’ फुकटचा सल्ला

वृत्तसंस्था । मागील काही दिवसापासून भारत-चीनमध्ये सीमावादवरून तणाव आहे. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला. या संघर्षामध्ये भारतीय सैन्यात २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेले. त्यांनतर सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सीमेवर तणाव असाच वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि … Read more

भारताचे तिन्ही सैन्य दल हायअलर्टवर; भारत-चीन सीमेवर सैन्य संख्या वाढवली

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत … Read more

गलवानध्ये जे घडलं, ते तुम्ही ठरवून केलं; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकरांनी चीनला सुनावलं

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आज पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. यासंघर्षाचं खापर भारतावर फोडणाऱ्या चीनला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. Wang Yi-S Jaishankar … Read more

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही! चीनला जशास तसं उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला यावेळी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी … Read more

गलवान खोरं आमचंच, तुम्ही तुमच्या सैनिकांना ताब्यात ठेवा! चीनची दर्पोक्ती

वृत्तसंस्था । भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन (Zhao Lijian) यांनी देशाच्या भूमिका मांडतांना गलवान खोरं(Galwan Valley) हे कायमच चीनचं होतं, असा दावा … Read more

गलवान खोऱ्यांतील जवानांच्या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने केला सलाम

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैन्याच्या या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने ट्विटरवर सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विक्की कौशलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी … Read more