कामबंद : कराड उपजिल्हा रूग्णालयात सफाई कामगार चार महिन्यांपासून पगाराविना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कामगारांची होणारी पिळवणूक होत आहे. तसेच ठेकेदारावर कारवाईसह अन्य मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगारांनी सांगितले. गेल्या चार महिन्यापासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नसल्याने कामबंदचा पवित्रा घेतला आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयात म्हात्रे (गरूडझेप) नामक कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून … Read more

मुंगसाच्या केसांपासून बनवलेले 1 हजार 735 पेंटींग ब्रश जप्त; वनविभागाची कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरात विविध रंग व्यवसायिक दुकानदारांवर वन विभागाने धाड टाकून मुंगूस या वन्य प्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त केले. बुधवारी १५ रोजी वनविभागाने ही धडक कारवाई केली. यामध्ये कराड व मलकापूर येथील ५ दुकानदारांकडून मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले 1 हजार 735 ब्रश जप्त करण्यात आले आहेत. याबाबत वन विभागाकडून … Read more

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेव्हल्सचा टायर फुटल्यानं मोठा अपघात; स्विफ्ट कार 200 फूट उडाली..

कराड : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ ट्रेव्हल्स आणि स्विफ्ट कारचा मोठा अपघात झाला आहे. ट्रेव्हल्सचा टायर फुटून झालेल्या अपघाताने स्विफ्ट कार जवळजवळ २०० फूट दूर उडाली आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, किरण निसरेकर (वय 28) राहणार गडहिंग्लज हे स्विफ्ट कारने (MH09 DM 3426) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने … Read more

“खेलो इंडिया” जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये लिबर्टी मजदूर मंडळास अजिंक्‍यपद

कराड | सातारा येथे झालेल्या “खेलो इंडिया” कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये लिबर्टी मजूर मंडळाच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले आहे. देशभरामधील तरुण खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेल्या या उपक्रमास सातारा जिल्ह्यामधील कबड्डी संघानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 18 वर्षे वय व 70 किलो वजनी गटांमध्ये अटीतटीने लढल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये लिबर्टी मजदूर … Read more

दुर्दैवी घटना! पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू; कराडात तणावाचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नगरपालिका शाळा क्रमांक दहाच्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. विराट विजय चव्हाण (वय 5 रा. बुधवार पेठ, कराड) असे मृत्यू झालेल्या … Read more

लस नाही… प्रवेश नाही : कराडला प्रशासकीय कार्यालयात कडक अंमलबजावणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी आज सोमवार दि. 6 डिसेंबरपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. कराडला शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशद्वारावरच लस नाही तर प्रवेश नाही असे फलक … Read more

कराडचे युवा उद्योजक निशात महाडीक अपघातात जागीच ठार

कराड | येथील युवा उद्योजक निशात वसंतराव महाडीक (वय- 42) यांचे संगमनेर येथे अपघतात निधन झाले. शनिवारी रात्री उशिरा संगमनेरच्या सेवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मागून कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. मोबाईलच्या विवो कंपनीत ते एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत होते. शहरातील युवा उद्योजक म्हणून त्यांचा लाैकीक होता. पोलिसांनी दिलेली … Read more

आपली प्रेरणा ज्ञान, सेवा असेल तर पैसा आपोआप धावत येतो : देवेंद्र फडणवीस

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजात टेक्नोलाॅजीमुळे मोठे परिवर्तन होत आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. डाॅक्टर हे ग्रामीण भागात जायला तयार नव्हते, तेव्हा टेक्नालाॅजीमुळे माणूस जवळ आणता आला. देशात सर्वात अधिक गुंतवणूक ही आरोग्यावरती होणार आहे. पन्नास वर्षात जेवढे काॅलेज उभारले त्यापेक्षा जास्त 5 वर्षात मेडिकल काॅलेज आपण उभारलेत. प्रेरणा ही ज्ञान आणि सेवाच … Read more

कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरूगेश निराणी यांना डी. लिट पदवी प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ प्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना विद्यापीठाच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रविण शिंगारे, डॉ. निलम मिश्रा, विनायक भोसले आदी … Read more

कराड बाजारभाव : टोमॅटो, भेंडी व शेवगा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, भेंडी व शेवग्याला चांगला दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 4 रोजी टोमॅटोची आवक 235 कॅरेट झाली असून 10 किलोचा दर 400 ते 500 रूपये होता. तर भेंडी 70 पोती आवक असून दर तेजीत असला तरी 500 ते 600 रूपये 10 किलोचा दर होता. तर … Read more