शिवसेना आमदारांना 50 तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना 700- 800 कोटीचा निधी : आ. महेश शिंदे

सातारा | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदारांना 50 कोटी तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना 700- 800 कोटीचा निधील जात होता. कोरेगाव मतदार संघात यापुढे राष्ट्रवादीचा आमदार असेल शिवसनेचा नाही, असे जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगत असल्याचा आरोप बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले महेश शिंदें यांनी … Read more

राजकीय भूकंप : कोरेगावचे आ. महेश शिंदे गुजरातमध्ये?

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांच्यात महेश शिंदे यांचा समावेश असून त्यांचा मोबाईल नंबर दुसरीकडे ट्रान्सफर केला आहे. गुजरातमधील एका हाॅटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचेही आता या बातमीकडे लक्ष लागून … Read more

राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला

Koregaon Police Satara

सातारा | उत्तर कोरेगाव भागात असलेले भोसे (ता. कोरेगाव) येथील उपसरपंच अजय अरुण माने यांच्यावर विकास सोसायटी निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी भोसे- आझादपूर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजय माने यांनी भोसे गावातील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे. … Read more

ट्रीपल मर्डर : अनैतिक संबधातून पत्नीसह पोटच्या दोन मुलांचा बापानेच केला खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पत्नी आणि स्वतः च्या पोटच्या दोन मुलांचा बापानेच खून केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्हा हादरला आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे पत्नी योगिता (वय- 38) या हिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे. कोरेगाव तालुक्यातील या ट्रीपल मर्डरने पोलिस खात्यासह जिल्हा हादरला … Read more

भव्य मिरवणुकीने कोरेगावात श्रीराम नवमी उत्सव साजरा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव येथील प्रभू श्री राम मंदिरास आज 100 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त तसेच श्रीराम नवमी निमित्त श्री राम सेना कोरेगाव यांच्या वतीने शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. कोरेगाव येथे श्रीराम मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरास तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त श्री राम सेना कोरेगाव यांच्यावतीने विविध धार्मिक … Read more

गणपतीपुळेतील समुद्रात बुडणार्‍या सातारमधील चार पर्यटकांना वाचविण्यात यश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सध्या गणपतीपुळे या ठिकाणी फिर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक जात आहेत. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी व समुद्रातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून चार पर्यटक गेले होते. समुद्रात ते गेले असता अचानक आलेल्या लाटांमुळे ते बुडाले. यावेळी त्यांना जेसकी बोट चालकांनी बुडण्यापासून वाचवले. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

सहकार क्षेत्रात खळबळ : कोरेगावचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात

Jardeshwer Koregaon

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात सध्या चर्चेत असलेला कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला आहे. राज्याचे साखर संचालक यांनी साखर कारखान्याच्या अवसायकपदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती कि. काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने, इतर अनेक बँकांच्या … Read more

सेवानिवृत्त जवानाची जंगी मिरवणूक : नायगावमधील ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करत सत्कार

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नायगाव गावचे सुपुत्र प्रदीप अशोकराव धुमाळ हे १९ वर्षे देशसेवा करून ३१ जानेवारी रोजी सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्त झाल्यानंतर ते नायगाव येथे घरी परत आले असता त्यांचा व कुटुंबीयांचा गावातील ग्रामस्थांनी सत्कार केला. तसेच यावेळी फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून गावातून मिरवणूकही काढली. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

सातारा जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी थंडीच्या कडाक्यात मतदान प्रक्रिया सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायती साठी आज मतदान होत असून सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या थंडीचा कडाका असल्यामुळे मतदानाला थंड प्रतिसाद असल्याचे सकाळी दिसून आले. या निवडणुकीसाठी 113 मतदान केंद्र असून 266 उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. तब्बल 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होते आहे. … Read more

कृष्णा नदीला पूर : अवकाळी पावसाचा कहर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलावर आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातून लोक गर्दी करू लागले आहेत. तसेच जिहे कठापूर – कोरेगाव या मार्गावर पुलावर पाणी आल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. … Read more