वेण्णालेक ओव्हरफ्लो : सातारा जिल्ह्याला 12 जुलैपर्यंत रेड अलर्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर पाचगणी, जावळी, पाटण या पूर्वेकडील भागात रात्रीपासून पावसाने सपाटा लावला आहे. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वरकर वासीयांच्या पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासह पुणे, रत्नागिरी आणि रायगड … Read more

महाबळेश्वरला मोजणी कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकाची मारहाण : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातीत कर्मचाऱ्यास मोजणीच्या कामावेळी माजी नगरसेवक संजय पिसाळी यांनी मारहाण केली. आज चार दिवस झाले तरी संशयित आरोपीस अटक न झाल्याने भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावुन कामबंद आदोलन सुरु केले आहे. बेदम मारहाणीमुळे जखमी भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातील कर्मचारी रविंद्र फाळके यांच्यावर वाई येथील … Read more

क्षेत्र महाबळेश्वरमध्ये नृहसिंह जयंती उत्साहात साजरी

Nrihsingh Jayanti Mahabaleshwar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे नृरसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार सुषमा पाटील यांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आली. श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ मंडळ क्षेत्र महाबळेश्वर,व्यापारी संघटना यांच्या यांच्यावतीने नृरसिंह जयंती जयंती साजरी करण्यात … Read more

महाबळेश्वरात पसरलीय गुलाबी थंडीबरोबर धुक्याची दुलई

Mahabaleshwar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात एकाबाजूला उष्णतेची लाट पसरली असताना राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर मात्र दाट धुक्यात हरवले आहे. या ठिकाणी निसर्गाचा अनोखा अविष्कार पहायला मिळत आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. या ठिकाणी पडणाऱ्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. महाबळेश्वर … Read more

महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांसह कुणावरही अन्याय होऊ देणार नाही : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray Mahabaleshwar

महाबळेश्वर प्रतिनिधी : सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथील विकासासाठी सुमारे १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच महाबळेश्वर बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी शासनस्तरावरून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महाबळेश्वरच्या बाजारपेठेच्या आराखड्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्यामुळे त्यांच्या शिष्टमंडळाने आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मंत्री ठाकरेंनी व्यापार्याची नाराजी दूर करीत महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांसह कुणावरही अन्याय होऊ … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून महाबळेश्वर दाैऱ्यावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाबळेश्वर दौऱ्यावर आजपासून दि. 4 मे रोजी आले आहेत. त्यांचे महाबळेश्वर येथील राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महाबळेश्वरचे तहसिलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम प्राधिकरण पुणे विभागाचे … Read more

महाबळेश्वर येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे

सातारा | महाबळेश्वर वनविभागाने धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हाॅलिडे होमला टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली वन विभागाची 5 एकर मिळकत आपल्या ताब्यात घेतली होती. वारंवार नोटीस पाठवुन देखील मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्ट्याचे नुतनीकरण केले नाही. त्या मुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी अखेर वन विभागास ही कारवाई करावी लागली अशी … Read more

महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

Mahableshwer Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या संदर्भात बांधकाम विभागात गेलेले मनसेचे युवानेते अभिषेक शिंदे यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दल अधिक माहिती अशी, महाबळेश्वर येथील देवसरे कदम वस्ती पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात मनसे नेते अभिषेक शिंदे यांना … Read more

महाबळेश्वरला फिरायला जाताना पसरणी घाटात द बर्निंग कारचा थरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई येथील पसरणी घाटात (Pasrani Ghat) भर दुपारी द बर्निंग कारचा (Burning Car) थरार पाहायला मिळाला. पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार बसवत व सुजीता बसवत हे बहीण-भाऊ टाटा टिगर कारमधून महाबळेश्वरला (Mahabaleshwar) फिरण्यासाठी जात होते. आज गुरुवारी दि. 14 रोजी दुपारी पसरणी घाटात धावत्या कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, याबाबतची … Read more

महाबळेश्वरच्या विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या महाबळेश्वरचा कायापालट लवकरच केला जाणार आहे. कारण महाबळेश्वरला पर्यटन वाढीसाठी तसेच विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महाबळेश्वरच्या मार्केटचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more