केंद्रीय मंत्रिमंडळात मित्रपक्षातील नेत्यांना मिळणार स्थान? मोठा फेरबदल होण्याची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.

नोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या भेटीची माहिती दिली. तसेच अभिजीत मुखर्जी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं.

३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला

३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.’ असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे सादर केलं आहे.

जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर , मोदी सरकारला मोठा झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | देशात मंदी आहे पण ते मान्य करण्याचे धाडस मोदी सरकार करत नाही. मात्र, जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा … Read more

कलम 370 प्रकरणी मोदी सरकारला झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात पाच सदस्यांचे खंडपीठ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करणार आहे. यासोबतच न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील मीडियाच्या स्वातंत्र्यासंदर्भातही केंद्रातील मोदी सरकारला नोटीस जारी केली आहे. तसंच या नोटीशीला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष … Read more