ऑफिसमध्ये फ्लर्टींग करणं आरोग्यासाठी फायदेशीर; फ्लर्टींगमुळे तणाव पातळी कमी होते, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र टीम : दिवसाचा थकवा आणि कार्यालयातील कामाच्या दबावामुळे लोकांच्या तणावाची पातळी वाढली आहे. ताणतणावाची सर्वाधिक तक्रार केवळ जॉब असलेल्या लोकांमध्येच दिसून येते. लोकांना तणावातून मुक्त करण्यासाठी वैज्ञानिकांना आता एक कल्पना मिळाली आहे ज्यामुळे केवळ त्यांचा ताण कमी होणार नाही तर ते कार्यालयीन वातावरणाचा आनंद लुटतील. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक लेआ शेपार्ड म्हणतात … Read more

विनाअनुदानित LPG सिलिंडर 19 रुपयांनी महाग, विमानाच्या इंधन किंमतीतही वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे बुधवारी विमानाच्या इंधन (एटीएफ) च्या किंमतीत 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. विना अनुदानित एलपीजी सिलिंडरही 19 रुपयांनी महागला आहे. दराबाबत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीतील विमानाच्या इंधनाची किंमत प्रतिलिटर 1,637.25 रुपये म्हणजेच 2.6 टक्क्यांनी वाढून 64,323.76 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळे सलग दुसर्‍या महिन्यात … Read more

नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा; पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे तरुणाईला आवाहन

गडचिरोली प्रतिनिधी । सर्वांनी दारूला नाही म्हणा, नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी तरुणाईला केले आहे. अभय बंग हे मुक्तिपथ संस्थेचे संस्थापक असून गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ अभियान राबविले जात आहे. दारूच्या पहिल्या घोटापासूनच दूर रहा अभय बंग यांनी म्हंटले की, नववर्षाची पहाट उंबरठ्यावर आली आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण … Read more

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर

  हॅलो महाराष्ट्र टीम । पुणे प्रशासनाने राजकीय पक्षांना भीमा-कोरेगाव येथे कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे सांगितले आहे. शासकीय पातळीवर सरकारकडून येथे कार्यक्रम घेण्यात येईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे घटनास्थळावर नजर ठेवली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी … Read more

‘नथुराम गोडसेचं मंदिर बांधणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?; भाजपच्या टीकेला मंत्री अस्लम शेख यांचे प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा समावेश उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात केल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशी टिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली आहे. भाजपच्या या टीकेला स्वतः मंत्री अस्लम शेख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नथुराम गोडसेंच मंदिर बांधणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार? अशी … Read more

माझा पक्ष सोडून सर्वच पक्षात घराणेशाही – रामदास आठवले

सातारा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.माझा पक्ष सोडून सर्व पक्षात घराणेशाही आहे असे मत आठवले यांनी यावेळेस व्यक्त केले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता देखील सादर केली. त्यांनी म्हंटले की, मी नाही नाराज म्हणून साताऱ्यात आलोय आज. आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी … Read more

SBI ग्राहकांना नवीन वर्षाची भेट; 1 जानेवारीपासून 7.90% व्याज दराने गृह कर्ज

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नवीन वर्षात ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने बाह्य बेंचमार्क कर्ज दर 0.25 टक्क्यांनी म्हणजेच 25 बेस पॉइंटने कमी केले आहे. या कपातीनंतर बाह्य बेंचमार्क आधारित दर (ईबीआर) वार्षिक 8.5 टक्क्यांवरून 7.80 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून लागू … Read more

हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे पिता पुत्राचे सरकार आहे. हे जनतेचे सरकार नाही. जर आज हा मंत्रिमंडळ … Read more

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’

नवी दिल्ली : देशातील पहिले’चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (सीडीएस) यांचे नाव जाहीर झाले आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारतील. सीडीएसला तीन सैन्यात ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात येईल. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत. सीडीएस हा एक फोर स्टार जनरल असेल आणि त्याचा कार्यकाळ तीन … Read more

हम मांगने वाले नही, हम देने वाले है; पक्षावर नाराज नसल्याचे संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मी आणि माझे कुटुंब नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे … Read more