रशियाने सौदी अरेबियाला दिला मोठा धक्का, तेल उत्पादनात तिसर्‍या क्रमांकावर ढकलून दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता रशियानेही तेल उत्पादनाच्या बाबतीत सौदी अरेबियाला मोठा धक्का दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींवरून रशिया आणि सौदी अरेबिया दरम्यान किंमत युद्ध (Price War) सुरू झाले. एकीकडे सौदी अरेबियाला रशियाने तेल उत्पादन कमी करावे अशी इच्छा होती, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी तेलाची घसरण थांबू शकेल. … Read more

दिल्लीत डिझेल झालं स्वस्त; केजरीवाल सरकारने वॅट करात केली मोठी कपात

नवी दिल्ली । इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य देशातील जनता त्रस्त असून दिल्ली सरकारने तिथल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. डिझेलवरील वॅटमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा वॅट कर ३० टक्क्यावरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर ८.३६ रुपये … Read more

देशात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान देशात सलग १३ व्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले … Read more

इंधन दर वाढ आजही कायम; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा धडका आजही कायम आहे. सलग दहाव्या दिवशी भारतीय इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके … Read more

शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत शून्य म्हणजेच -37.63 डॉलर/ बॅरलच्या … Read more

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा घसरण; गाठला महिनाभराचा नीचांक

मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीतील घसरण कायम आहे. त्याच्या परिणाम देशातील पेट्रोल-डिझलच्या किंमतीवर पाहायला मिळाला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कपात केली आहे. देशभरात आज पेट्रोल सरासरी १७ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) ६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे.

खुशखबर! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, महागाईत नागरिकांना मिळाला दिलासा

गेल्या काही महिन्यात महागाईने उचांक गाठला असताना नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाल्याने गुरुवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात कपात केली. देशभरात पेट्रोल१५ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.१४ रुपये झाले असून डिझेल ७२.२७ रुपये आहे.