मराठा आरक्षणावर पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत एक ट्विट केलं होतं. बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार कुटुंबात दुमत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये रंगू लागले होते. दरम्यान, पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अखेर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा … Read more

पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटबाबत विचारणा करताचं सुप्रिया सुळेंनी जोडले हात

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर ”सत्यमेव जयते ”असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं होतं. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंना आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंना पार्थच्या प्रतिक्रियेबाबत विचारलं असता, त्यांनी त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यावर पार्थ पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले..

नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर पार्थ पवार (parth pawar) यांनी ट्विट केलं आहे. सत्यमेव जयते, असं सांगत पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पार्थ … Read more

पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया सुळेही होत्या उपस्थित

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार आजोबांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर गुरुवारी रात्री दाखल झाले. सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याच जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. असं वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिलं आहे. यावेळी नेमकी काय … Read more

गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद … Read more

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. १० मिनिटं अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या. मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. … Read more

पार्थ पवार प्रकरणावर छगन भुजबळ म्हणाले.. “नया है वह!”

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन ‘नया है वह’ या शब्दात केलं आहे. तसंच अजित पवार नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळं … Read more

‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे’; शरद पवारांनी टोचले पार्थ पवारांचे कान

मुंबई । सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका बैठकी निमित्त आले होते. यावेळी प्रसार … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, … Read more