पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल; हनुमानगढी मंदिरात केली पूजा, रामलल्लाचे घेतलं दर्शन

अयोध्या । आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्यानंतर आता पुढील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. #WATCH live: … Read more

‘तू ही राम आणि मी ही राम’ रोहित पवारांचे ‘राम’ नामाचे ट्विट प्रचंड व्हायरल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जबरदस्त ट्वीट करत श्रीरामाकडे एक प्रार्थना केली आहे. सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये … Read more

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुंबईत तुफान ‘बॅनरबाजी’

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना मुंबईत शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेने मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली आहेत. यामध्ये ‘गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. वरळी, दादर, पवईसह विविध ठिकाणी शिवसेनेकडून ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. याबाबतचं वृत्त ‘झी २४’ वृत्तवाहिनीने … Read more

पद्मश्री मोहम्मद शरीफ यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण; जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी कहाणी

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.“मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर … Read more

अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आला- प्रकाश आंबेडकर

मुंबई । अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वचिंत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार आयोध्येत होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे. … Read more

‘राम मंदिराचे भूमिपूजन याआधीचं राजीव गांधींच्या हस्ते पार पडलंय’- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी … Read more

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा घरोघरी दिवाळीसारखा साजरा करा! पण.. – चंद्रकांत पाटील

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या … Read more

अशुभ मुहूर्तामुळेचं अमित शहा आणि राम मंदिर पुजाऱ्याला कोरोनाची बाधा- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या (Ram Temple in Ayodhya) मुहूर्तावरून भारतीय जनता पक्षावर निशाना साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्ताशी गृह मंत्री अमित शाह यांना झालेल्या कोरोनाचा संबंध जोडला आहे. सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि राम … Read more

शिवसेनेची वचनपूर्ती! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली मदत

मुंबई । अयोध्येत ५ ऑगस्टमध्ये राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर जाणार उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अनेक मान्यवरांना या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र , शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे आमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी … Read more

अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more