निमंत्रण मिळालं तरी राम मंदिर भूमिपूजनाला जाणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

मुंबई । सध्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ‘सीएनएन न्यूज १८’ वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more

अयोध्येत दिपोत्सव; राम मंदिर भूमिजनाला पंतप्रधान उपस्थित राहणार- योगी आदित्यनाथ

अयोध्या । अयोध्येत ४ आणि ५ ऑगस्टला दिपोत्सव होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम … Read more

राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच कोरोना महामारी संपेल; मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांचं तर्कट

भोपाळ । जगासह भारतात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. देशात आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. अशावेळी संपूर्ण जग कोरोना महामारिला नष्ट करण्यासाठी लस शोधण्यात लागलं असताना भाजपाचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक अजब … Read more

बकरी ईदचं का? अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजनही प्रतिकात्मक करा- खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  केला आहे. जलील यांच्या या … Read more

बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?- संजय राऊत

वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द इकॉनामिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. “भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेते आतातरी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा आतातरी बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाही?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित … Read more

राम मंदिर भुमिपूजनाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय- काँग्रेस

मुंबई । अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी काँग्रेस धावून आली आहे. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना राम … Read more

उद्धव ठाकरेंनी धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचं आवाहन

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे नक्की जातील असं सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी ट्विट करत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीला ट्रस्टकडून स्थगिती

अयोध्या । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारत-चीन सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनंही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे … Read more