” बिहारमध्ये कोरोना संपलाय का “?, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा संतप्त सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये करोना संपलाय का ?असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की कोरोना संपला तर मग तसं जाहीर करा,” अशी मागणी संजय राऊत यांनी … Read more

खरं तर 370 कलम हटविल्यानंतर केंद्राने काश्मिरात एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी ; सामनातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारणार असल्याचे म्हटल्यानंतर देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर आज 25 सप्टेंबरच्या सामना अग्रलेखातून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात सुसज्ज फिल्मसिटी उभारण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता शाब्दिक राजकारण रंगले आहे. शिवसेनेचे … Read more

”जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातायत”; गुप्तेश्वर पांडेंच्या स्वेच्छानिवृत्तीवर संजय राऊतांची टिप्पणी

मुंबई । सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून ते अपेक्षितच असल्याचं म्हटलं. सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र … Read more

बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे … Read more

एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प का बसले आहेत ?? सामनातून भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं होत. त्यावर आता शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली असून भाजपवर ही निशाणा साधण्यात आलाय. आपल्या हक्कांसाठी … Read more

‘मते कापणारी मंडळी’ एवढीच आता आंबेडकरवादी पक्षाची ओळख ; संजय राऊत यांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेने विरोधात कंगना रणावतचे समर्थन केले होते.त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आंबेडकरी पक्ष्याला लक्ष्य केले आहे. राज्यातील आंबेडकरवादी पक्षांनी स्वत:चे हसू करून घेतले आहे की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनातील … Read more

केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी – संजय राऊतांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे. काल राज्यसभेमध्ये कोरोनाचा … Read more

जया बच्चन चुकीचं असं काय बोलल्या? त्यांनी संपूर्ण देशाची भावनाच संसदेत मांडली- संजय राऊत

नवी दिल्ली । शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. जया बच्चन काय चुकीचं बोलल्या? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राज्यसभेत मंगळवारी खासदार जया बच्चन यांनी नाव न घेता अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला … Read more

महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? चंद्रकांत दादांनी उडवली राऊतांच्या विधानाची खिल्ली

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात फक्त ठाकरे ब्रँड असून हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला होता. राऊतांच्या या विधानाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखल घेत खाल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा उपरोधक सवाल करतानाच महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. … Read more

…म्हणून मला वाटते की राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जे काही कारस्थान चालले आहे ते महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे आणि त्यासाठी फक्त राज ठाकरेच नव्हे तर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे त्या सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा … Read more