एक पैसा घेतल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन : आ. शंभूराज देसाई

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही कोणतेही बंड केलेले नाही, तर उठाव केला. यासाठी कोणत्याही प्रकारचा एक पैसा घेतल्याचा पुरावा द्यावा, राजकारण सोडू. बाहेर 50 कोटी घेतल्याच्या काही चर्चा सुरू आहेत, याला महत्व नाही. तसेच आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेना सोडलेली नाही, असे शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. भाजप- शिंदे गटाने सत्ता … Read more

शिवसैनिक गद्दार म्हणतील याची शिंदे गटातील ‘या’ नेत्यांना अजूनही भिती? कमेंट बाॅक्स बंदच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल 40 शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरी मुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द उद्धव ठाकरेंचेच मुख्यमंत्रीपद गेल्याने राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे. शिवसैनिकांच्या … Read more

कॅबिनेटमध्ये ‘शंभूराज’ ओकेच, भाजपमध्ये रस्सीखेच?

सातारा प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट “ओके मध्येच” फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ … Read more

अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते – शंभूराज देसाई

Shamburaj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही फक्त नावालाच राज्यमंत्री होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते. येवडच नव्हे तर अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही. राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता असा दावा करत बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे. तसेच आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना … Read more

मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केलेले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देसाई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त फेसबुकवर अभिवादनाची पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये शंभूराज देसाई यांना ट्रोल केले जात आहे. साहेब, शिवसेनेनं गृहराज्यमंत्री पद देवून तुमच्यावर अन्याय केला. आता माजी … Read more

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन : गद्दारांना माफी नाही’ची घोषणाबाजी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेनेचे बंडखोर आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलकांना पोलिसांनी अडविले असून ताब्यात घेतले आहे. मात्र, यावेळी गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. यामध्ये सातारा … Read more

आ. शंभूराज देसाई यांना पक्षाची नोटीस : वर्षा बंगल्यावर आज न आल्यास अपात्रेची कारवाई होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांना शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून एक नोटीस आलेली आहे. या नोटीसीत आज बुधवारी दि. 22 रोजी होणाऱ्या सायंकाळी मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पक्षातून अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू … Read more

राजकीय भूकंप : शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई नाॅटरिचेबल, राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वजनदार शिवसेनेचे नेते व पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा मोबाईल नाॅट रिचेबल लागत आहे. त्यामुळे आता आ. शंभूराज देसाई नक्की कोठे आहेत याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, गुजरात कि मतदार संघात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच दुपारी … Read more

महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Mumbai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना … Read more

आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शासकीय विश्रागृहात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार महेश … Read more