पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आज बारमाही रस्ते : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Patan News

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील 130 गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील माजगाव – उरुल या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, माजगाव व उरुल … Read more

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा व राज्याचा विकास : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा | खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी … Read more

त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या आदेशाने आम्हांला धक्का बसला : आ. शंभूराज देसाई

कराड | सन 2019 च्या निवडणुकीनंतर ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडी करायची आहे, असे सांगीतले. त्यावेळी आम्हाला धक्का बसला. त्या बैठकीत ठाकरे यांनी पक्षाचा आदेश तुम्हाला मानावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मी राज्यमंत्री होतो, मात्र मला अधिकारच नव्हते. आमदार असताना जेवढा निधी आणला, तेवढा राज्यमंत्री असताना मला निधी आणता आला … Read more

मोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का : आ. शंभूराज देसाई यांची 60 वर्षानंतर एकहाती सत्ता

Morgiri Gram Panchayat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी … Read more

शिंदे- फडणवीस सरकारने 100 दिवसांत 700 शासन निर्णय काढले : आ. शंभूराज देसाई

Shamuburaj- Shinde- Fadnvis

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडेतेरा हजार रुपये आणि बागायतीसाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीची दोन हेक्टरपर्यंत मुदत तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. शंभर दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारने जनकल्याणाचे 700 शासन निर्णय काढले, असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा आदर्श बनविणार : आ. शंभूराज देसाई

सातारा | आदर्श शिक्षण देणे आणि आदर्श नागरिक घडविणे हे शासनाचे तसेच प्रशासनाचे उत्तरदायित्व असून त्या अनुषंगाने पाऊल टाकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या 15 प्राथमिक शाळा आदर्श म्हणून विकसित करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

कराड- चिपळूण मार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करा अशा सूचना संबंधितांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी … Read more

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप -शिवसेना एकत्र लढणार – शंभुराज देसाई

SHAMBHURAJ DESAI

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूका भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ते कराड विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा … Read more

सत्यजितसिंह कोण? : मंत्री शंभूराज देसाई यांचा प्रतिसवाल

Patan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वकर्तृत्व असल्याने राज्यात मला चांगलेच ओळखले जाते. पण दुसऱ्याच्या ओळखीची काळजी करणाऱ्यांनी आपली ओळख नेमकी कुठे आहे, हे अगोदर तपासून घ्या. आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदार संघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठ्या फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीमध्ये … Read more

जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मार्चअखेर 100 टक्के खर्च करा : आ. शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ज्या विभागांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला आहे. तो निधी मार्च 2023 पर्यंत शंभर टक्के कसा खर्च होईल. यासाठी आत्तापासूनच नियोजन करा. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामांच्या याद्या प्रशासनाकडे लवकरात लवकर द्याव्यात. तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more