तापमान पोहोचले 41 अंशांवर; शाळेत मुलांची लाहीलाही

summer

औरंगाबाद – राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हापातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या. याबाबत औरंगाबाद जिल्हा प्रशासन विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे विलंबाने शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक … Read more

शहरातील तापमानाने गाठला उच्चांक 

summer

औरंगाबाद – शहरात उन्हाचा पारा वाढत असून चिकलठाणा वेधशाळेत काल 40.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी इतके तापमान 17 आणि 18 एप्रिल 2020 रोजी नोंदले गेले होते. शहरात गेली तीन दिवस तापमानाचा पारा 40.6 अंश सेल्सिअस वर राहिला. काल तापमानात आणखी वाढ झाली. आगामी सहा … Read more

शहराचे तापमान गेले 40 अंशांवर

summer

औरंगाबाद – मार्च महिन्यातच औरंगाबादकरांना उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागत असून काल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. गेल्या दहा दिवसात दुसर्‍यांदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील चार दिवसात तापमानाचा पारा 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात 18 मार्च रोजी 40 अंश … Read more

मराठवाड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार

summer

औरंगाबाद – मराठवाड्यात उन्हाळ्यातील तापमान एक ते दोन अंशांनी तर आठ जिल्ह्यांत सरासरी पाऊस 8 ते 21 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी (सीएसटीपी) या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. त्यात मराठवाड्यातील ही स्थिती असेल. राज्यात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील 30 वर्षांच्या (1991-2019) तुलनेत 2021-2050 या … Read more

शहरातील तापमानाचा पारा @35.5; यावर्षीचे उच्चांकी तापमान

summer

औरंगाबाद – थंडीचा ऋतू नंतर आता सूर्य तळपायला लागला असून, शहरातील तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काल शहरात तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान 35.5 तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 35.5 अंश हे यावर्षीचे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात वाढ होण्यास सुरुवात … Read more

कुसुंबीमुरातील लहानग्यांसह महिलांची पाण्यासाठी 3 किलोमीटर वणवण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील कास भागातील मौजे कुसुंबीमुरा आखाडेवस्ती येथील नागरिकांना मोठ्या पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात महिलांना आणि लहान मुलांना झऱ्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन लहान- लहान मुले आणि महिला डोंगर कपारीतून पायवाट काढत ते 3 किलोमीटर रोज प्रवास करतात. या … Read more

हाय गरमी..! यंदाच्या गरमीने मोडला मागील 121 वर्षांचा इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्य इतका तळपला की सर्वसामान्य नागरिकांना लाही लाही करून सोडले. हाच उष्णतेचा कहर एप्रिल महिन्यात ही सुरू आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच देशातील काही भागात तापमान हे 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. इतकेच नाहीतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात … Read more

वाढत्या गर्मीनं विदर्भ बेजार; अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद

अकोला । एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 47.4 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान सहन … Read more

देशात उष्णतेची लहर; हवामान खात्याकडून ‘या’ राज्यांना रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली । यंदाच्या उन्हाळ्याच्या मौसमात देशाला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये उन्हाच्या झळा बसत असून येथील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते. त्याचप्रमाणे देशातील अन्य भागांमध्ये देखील उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उत्तर भारतात पुढील ३ दिवस तीव्र तापमानाचा अंदाज … Read more

लोकडाउन मुळे घरातच असला तरी उन्हाळ्यात लिंबूपाणी घ्या! ‘हे’ आहेत फायदे

lemon water medical use

हॅलो Health । लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना … Read more