हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ रुग्ण तर संपूर्ण चीनमध्ये १० नवीन रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बीजिंग मध्ये काही ठिकाणी पुन्हा एकदा संचारबंदी जाहीर करण्यात आली असून पहिली ते तिसरीच्या शाळा उघडण्याच्या निर्णयावरही स्थगिती आणण्यात आली आहे. जवळपास ५६ दिवसानंतर चीनमध्ये कोरोनाचे हे रुग्ण आढळून आले आहेत.
या रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे लक्षात आल्यावर आता कुठे सुरळीत जनजीवनाला सुरुवात केलेल्या चीनमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. चीनमधील शेवटच्या रुग्णाला ९ जुंरोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांत चीनमधील शहरांमध्ये अलगाव ठेवण्यात आला होता. तसेच विदेशातून परत आणलेल्या चीनी नागरिकांनाही बीजिंग मध्ये न उतरवता इतरत्र उतरवून १४ दिवसांच्या अलगावात ठेवण्यात आले होते. त्यामूळे तीन दिवसात समोर आलेल्या रुग्णांमुळे चीनमध्ये चिंता वाढली आहे. मात्र यावर तात्काळ कृती करीत काही ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे.
माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाल्यमुळे पहिली ते तिसरी पर्यंत शाळा उघडण्याचा निर्णयही स्थगित करण्यात आला आहे. शुक्रवारी बाहेरून बीजिंगमध्ये आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचे निदान झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क शोधणे सुरु आहे. बीजिंग च्या शिचेन्ग जिल्ह्यात संक्रमित व्यक्ती सापडली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील २ व्यक्ती सध्या निरीक्षणाखाली आहेत. तसेच या व्यक्तीचा मुलगा ज्या वर्गात शिकत होता त्याच्या वर्गातील ३३ विद्यार्थी आणि १५ शिक्षकांनाही निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.