औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
मागील २४ तासांत मनपा हद्दीत नवीन वाढलेल्या रुग्णांची संख्या जवळपास १५० आहे. यामध्ये शिवशंकर कॉलनी, सातारा परिसर, आकाशवाणी परिसर, मयूर पार्क, नागेश्वरवाडी येथे सरासरी १० रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातही ५० हून अधिक रुग्ण वाढले असून याठिकाणच्या अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. औरंगाबादला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर नागरिकांनी कर्फ्युचं पालन प्राधान्याने करावं असं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.