हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतात समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तज्ञांनी सरकारच्या अडथळ्यामुळे न स्वीकारले जाणारे हे सत्य स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून वाढणारे रुग्ण पाहता हा दावा करण्यात आला होता. मात्र आयएमसीआर ने हा दावा फेटाळून लावल्यानंतर देशातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी देशात समूह संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे माजी संचालक डॉ एम.सी मिश्रा यांनी आयएमसीआर च्या एकूण पाहणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनीही संचारबंदीचे नियम शिथिल झाल्यापासून जसे लोक बाहेर पडले तशी रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगितले. ज्या भागात रुग्ण नव्हते अशा भागातही संसर्ग झाल्याचे समर आले आहे. त्यामुळे हा समूह संसर्गच आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
समूह संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ती मान्य करण्याची गरज आहे, म्हणजे लोक गैरसमजात राहणार नाहीत असे त्यांनी सांगितले. आयएमसीआरच्या पाहणीतच असे दिसून आले आहे की, कोणताच प्रवास इतिहास नसणाऱ्या ४०% लोकांना कोरोनाबाधा झाली आहे. तसेच ते इतर कोरोना संक्रमित रुग्णांच्याही संपर्कात आलेले नाहीत. तर मग हा समूह संसर्ग नाही तर काय आहे? असा प्रश्न विष्णुशास्त्रज्ञ शहीद जमाल यांनी विचारला आहे. दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ अरविंद कुमार यांनीही आयएमसीआर चे म्हणणे स्वीकारले तरी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या शहरात समूह संसर्गच झाला असल्याचे म्हंटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.