कोरोनामुळे हादरली अमेरिका ! एका दिवसात तब्ब्ल 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत शुक्रवारी एकाच दिवसात कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक 40,000 नवीन घटनांची नोंद झाली. गेल्या एप्रिलमधील एका दिवसात नोंदवलेल्या घटनांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. या संख्येमुळे काही राज्यांच्या राज्यपालांच्या योजना या ठप्प झाल्या आहेत तसेच राज्ये उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.या संक्रमितांच्या संख्या वाढल्यामागे मोठ्या प्रमाणावर तपास सुरू असला तरी तज्ञ म्हणतात की, हे विषाणू पुन्हा परत येत असल्याचा पुरेसा पुरावा आहे.

अमेरिकेत या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या आणि रूग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्याही दररोज वाढत आहे. विशेषत: देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अ‍ॅरिझोना, टेक्सास आणि फ्लोरिडा ही सर्वाधिक संसर्ग असलेली राज्ये आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते 24 एप्रिल रोजी सुमारे 36,400 प्रकरणे नोंदली गेली होती.

अमेरिकेत दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या ही 600 च्या आसपास असते, ती एप्रिलच्या मध्यात 2,200 होती. मात्र, काही तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे की लोकांचा सध्याचा मृत्यू दर हा आधीच्या पातळीवर जाईल कारण उपचार आणि बचाव हा पूर्वीच्या तुलनेत आता सुधारला आहे आणि संक्रमित लोकांमध्ये ज्येष्ठांपेक्षा तरुण जगण्याची क्षमता अधिक असते. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, या धोकादायक विषाणूच्या संसर्गामुळे अमेरिकेत 1,24,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 24 दशलक्ष लोकांना याची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment