विराट- हार्दिकचा पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ व्हायरल, नताशाने केली राॅमेंटीक कमेंट 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हार्दिक पांड्या तसा अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत तो नेहमीच काळजी घेत असतो. अनेकदा आपले जिममधील वर्कआउट चे व्हिडिओ तो अपलोड करत असतो. हार्दिक आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पुशअप्स मारताना दिसत आहे. त्याच्या या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत.

केवळ चाहतेच नव्हे, तर बॉलिवूड अभिनेत्री आणि महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाल्याचे दिसून आले. हार्दिकच्या या व्हिडीओला कॅप्टन कोहलीने दमदार उत्तर दिलं. पण त्यावर हार्दिकने जो व्हिडीओ पोस्ट केला, त्यावर हार्दिकची पत्नी नताशा हिने हार्दिकसंबंधी रोमँटिक रिप्लाय दिला. विराटने आधी ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह त्याने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. या नव्या ट्विस्टवर चाहते भलतेच खुश झाले. विराटने दमदार पुश-अप्स चॅलेंज दिल्यावर, ‘हार मानणं हे टीम इंडियाच्या खेळाडूंच्या रक्तातच नाही’, हे हार्दिकने दाखवून दिलं.


View this post on Instagram

 

Hey bruh @virat.kohli Always got your back ???? @rahulkl @krunalpandya_official guys would you like to have a go ✅???? and special thanks to my darling @coach_a.i.harrsha for pushing me ✅

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on Jul 4, 2020 at 6:25am PDT

 

हार्दिकने कोहलीला दमदार प्रत्युत्तर दिलं. त्याने फ्लाईंग पुश-अप्स मारल्या. हवेत असताना टाळ्यादेखील वाजवल्या, पण महत्त्वाचं म्हणजे त्याने मागच्या बाजूला टाळ्या वाजवण्याचा पराक्रम करून दाखवला. विराट यावर काय उत्तर देतो?  याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं. विराटने त्याच्या व्हिडीओवर ‘कमाल वर्कआऊट’ अशी कमेंट केली. तर हार्दिकची पत्नी नताशी हिने अतिशय रोमँटिक अशी कमेंट केली. माझी बेबू सगळ्यात मस्त आहे, अशी कमेंट तिने केली. हार्दिकच्या हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.