पाकिस्तानमध्ये एका 27 वर्षीय टीव्ही अँकरची गोळ्या घालून हत्या, पंतप्रधान इम्रान खान यांनी केला असा दावा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. महिला पत्रकार शाहिनाला शनिवारी शूट करण्यात आले. शाहीना एक सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. तिच्या घरात घुसून शाहीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर तिच्या घरी पोहोचले आणि तिने दार उघडताच त्यांनी शाहीनावर अनेक गोळ्या झाडल्या. शाहीनाला पाच गोळ्या लागल्या. विशेष म्हणजे 1992 पासून पाकिस्तानमध्ये 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. हे हास्यास्पद आहे कि, गेल्या आठवड्यातच पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये पत्रकार सुरक्षित असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराची बदली झाली
काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानच्या तुर्बत येथे महिला पत्रकार शाहीना शाहीनची बदली झाली होती. शाहीनपूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात उरुज इक्बाल नावाच्या एका महिला पत्रकारालाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

शाहीन स्थानिक मासिकाची संपादकही होती
यापूर्वी शाहीनने इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही वाहिनीवर काम केले होते. यानंतर त्यांची निवड सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये झाली. इस्लामाबादमध्ये काही महिने थांबल्यानंतर शाहीनची बलुचिस्तानमध्ये बदली झाली. तिथे शाहीन एका स्थानिक मासिकाची संपादकही होती. 27 वर्षीय शाहीन ही क्वेटा विद्यापीठातून पीएचडी करत होती.

पतीनेच खून केल्याचा कुटुंबाला संशय आहे
पोलिसांना अशी माहिती मिळाली की, एका अज्ञात व्यक्तीने शाहीनला कारमध्ये नेऊन रुग्णालयात पोहोचवले. मात्र, काही वेळाने तो गाडी सोडून पळून गेला. शाहीनच्या कुटुंबीयांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शाहीनच्या नवऱ्याचा देखील समावेश आहे. पाच महिन्यांपूर्वीच शाहीनचे लग्न झाले होते.

गेल्या 28 वर्षांत 61 पत्रकार ठार
गेल्या वर्षी मे महिन्यात महिला पत्रकार उरुज इक्बाल यांनाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. ती एका खासगी टीव्ही चॅनलसाठी काम करायची. एका स्थानिक नेत्यावर खुनाचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी तो नाकारला. आत्तापर्यंत, त्यांचा खुनी सापडला नाही. उरुजची तिच्या ऑफिसबाहेरच हत्या करण्यात आली होती. यावेळी हल्लेखोर कारने आले आणि नंतर आरामात पळून गेले. 1992 पासून पाकिस्तानमध्ये सुमारे 61 पत्रकारांची हत्या झाली आहे.

बलुचिस्तान सरकारचे वकील लियाकत शाहवानी यांनी घटनेबद्दल दु: ख व्यक्त केले – शाहीनची हत्या करणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.