अहमदनगर प्रतिनिधी । जगभरात कोरोना विषाणूच्या औषधासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत असून अद्याप त्यांना यात यश आल्याचे दिसून येत नाही. मात्र भारतातील योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने या विषाणूवर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ते औषध आज जाहीर देखील केले आहे. कोरोनिल असे या औषधाचे नाव असून ते ५ ते १४ दिवसात कोरोनाला बरे करते असा दावा त्यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून या औषधाची शहानिशा करण्यास सांगितले आहे.
‘५ ते १४ दिवसांत कोरोना बरा करणारं आयुर्वेदिक औषध आणल्याचा दावा एका भारतीय कंपनीने केलाय. तसंही ५ ते १४ दिवसांत कोरोना बरा होतो हे WHO नेही सांगितलंय.पण तरीही लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने कंपनीच्या दाव्याची शहानिशा करावी व खरा असेल तर भारतीयांसाठी यात नफेखोरी करू नये.’ असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. आचार्य बालकृष्ण यांनी आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचे हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे.
५ ते १४ दिवसांत कोरोना बरा करणारं आयुर्वेदिक औषध आणल्याचा दावा एका भारतीय कंपनीने केलाय. तसंही ५ ते १४ दिवसांत कोरोना बरा होतो हे WHO नेही सांगितलंय.पण तरीही लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने कंपनीच्या दाव्याची शहानिशा करावी व खरा असेल तर भारतीयांसाठी यात नफेखोरी करू नये.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 23, 2020
https://twitter.com/RRPSpeaks/status/1275428198361124864
सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनील हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे. असे असले तरी त्याची संपूर्ण शहानिशा करण्यास पवार यांनी सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.