सातारा जिल्ह्यात 51 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1543 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच सातारा येथील एका 65 वर्षीय बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५४३ वर पोहोचली आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. खंडाळा तालुक्यातील संघर्ष कॉलनी, शिरवळ येथील, 29 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी येथील 40 वर्षीय पुरुष, काबूल आळी येथील 16 वर्षाचा युवक, खटाव तालुक्यातील विसापूर येथील 44 वर्षीय पुरुष, निमसोड येथील 16 व 19 वर्षीय युवती, वारुड येथील 25 वर्षाचा पुरुष, वडूज येथील 22 वर्षाचा पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 17 वर्षीय युवक, 19 वर्षाची युवती, 70 वर्षाचा पुरुष, बोपेगाव येथील 47 वर्षाची महिला, कराड तालुक्यातील मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, उब्रंज येथील 31 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 45 वर्षाची महिला, पाटण तालुक्यातील महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील 20, 16 वर्षीय युवक, 24 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, मार्डी येथील 60 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील पुणवडी येथील 42 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, 50 व 30 वर्षीय महिला व 9 वर्षाचा बालक, 21 वर्षाची महिला, 15 वर्षाची युवती, कास येथील 36 वर्षाची महिला, 13 वर्षाची युवती, 11 वर्षाची बालिका, 53 वर्षाचा पुरुष, 47 वर्षाची महिला 18 व 17 वर्षाची युवती, कुसुंबी मुरा येथील 32 वर्षाचा पुरुष, सातारा तालुक्यातील रविवार पेठ, सातारा येथील 42 वर्षाचा पुरुष, जिहे येथील 46 वर्षाचा पुरुष, 39 वर्षाची महिला, 46 वर्षाची महिला, 16 वर्षाचा युवक, 50 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 80 वर्षाची महिला, कण्हेर येथील 80 व 80 वर्षाच्या महिला, गोडोली, शाहूनगर, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष (मृत), फलटण तालुक्यातील गुनावले येथील 63 वर्षीय पुरुष, सरडे येथील 28 वर्षीय महिला, मलटण येथील 58 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

एका बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा गोडोली, शाहूनगर, सातारा येथील 65 वर्षीयकोरोना बाधित ( सारी ) असलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, या पुरुषाला थायरॉईडचा त्रास होता, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.